बेळगाव : जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून काँग्रेसचा विजय झाला पाहिजे, असे मत केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. शनिवारी बेळगाव दक्षिण मतदारसंघातील वडगाव येथे काँग्रेस प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. …
Read More »निपाणीच्या युवकाने बनवला समाज मनाचा ठाव घेणारा चित्रपट
लवकरच ‘गाभ’ चित्रपट प्रदर्शित ; समाजातील तरुण आणि जनावराची कथा निपाणी (वार्ता) : ‘गाभ’ हा शब्द उत्सुकता वाढविणारा असला तरी तो ग्रामीण भागात परवलीचा आहे. गाभ किंवा गाभण हे शब्द कृषक जीवनाची प्रचिती देतात. विशेषत: पशुपालकांचे जगणे त्याभोवती फेर धरणारे असते. बदलत्या अर्थ आणि कृषक कारणांमुळे वावर कसणाऱ्याला लग्नासाठी मुलगी …
Read More »हदनाळ परिसरात गव्या रेड्याचे दर्शन
शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण कोगनोळी : हदनाळ (तालुका निपाणी) येथील शेतामध्ये गव्या रेड्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी शेतामध्ये जाणाऱ्या शेतकरी बांधवांनी सतर्क राहून दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, हदनाळ येथील तुका पाटील आड्ड्याजवळ सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान काही …
Read More »आमदारपुत्र लाच प्रकरण; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे आंदोलन
कॉंग्रेस नेत्याना अटक; आमदार माडाळ वीरुपाक्षप्पांच्या अटकेचाही आग्रह बंगळूर : त्यांचे वडिल भाजप आमदार माडाळ वीरुपाक्षप्पा यांच्यावतीने ४० लाखांची लाच घेताना सरकारी अधिकारी प्रशांतकुमार एम. व्ही. यांना अटक केल्यानंतर काँग्रेसने शनिवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या राजीनाम्याची व आमदार वीरुपाक्षप्पा यांच्या अटकेची जोरदार मागणी केली. दरम्यान, या मागणीसाठी मुख्यमंत्री बसवराज …
Read More »होळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक
बेळगाव : होळी आणि रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक पार पडली. रंगोत्सवात सामाजिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था भंग होईल, असे कृत्य कोणीही करू नये यासह विविध सूचना या बैठकीत करण्यात आल्या. सोमवारी होळी पौर्णिमा आणि मंगळवारी रंगोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी, सीपीआय …
Read More »लोकप्रतिनिधींकडून विकासकामाचे फलक उभारणे बेकायदेशीर!
बेंगळुरू : सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती तेथील लोकप्रतिनिधींच्या फोटोसाहित लावण्यात येते मात्र ही विकास कामे सर्वसामान्य जनतेकडून कर स्वरूपात आकारलेल्या पैशातून केली जातात यामध्ये लोकप्रतिनिधींच्या नावाचा फोटो फलक लावण्याचा प्रश्नच येत नाही अशी याचिका बेंगळुरू येथील एका व्यक्तीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च …
Read More »निपाणीत सिलिंडर १११० रुपये!
महागाईचा भडका : व्यावसायिक सिलेंडर २१५१ रुपये निपाणी (वार्ता) : घरगुती गॅस हा स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक बनला आहे. घरगुती गॅसचे दरात सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गॅस ५० रुपयांनी महागला असून निपाणीत हा दर ११२० रुपये ५० पैशावर पोहोचला आहे. तर व्यावसायिक गॅस दरात तब्बल ३५० …
Read More »‘युथ जोडो, बूथ जोडो’ अभियानाचा शेंडुर, गोंदुकुप्पी येथे प्रारंभ
निपाणी (वार्ता) : कर्नाटक प्रदेश युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार आणिमाजी मंत्री विरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बसवराज पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, युवा उद्योजक रोहन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शेंडूर, गोंदुकुप्पी येथे ‘युथ जोडो, बूथ जोडो’अभियान राबविण्यात आले. …
Read More »आश्वासनानंतर म्युनिसिपल इंग्रजी शाळेच्या शिक्षिकांचे आंदोलन मागे
नगराध्यक्षांची भेट ; वेतन देणार सुरळीत निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु आहे. या ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी असली तरी सर्वच शिक्षक तळमळीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. काही शिक्षिकांना १३ हजार ६०० तर काहींना १ हजार वेतन आहे. काही शिक्षिकांचे १३ हजार ६०० पैकी ६ हजार ६०० …
Read More »हंचिनाळ गाव मुटभर, समस्या ढीगभर
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नागरिकांचे हाल कोगनोळी : येथून जवळच असणाऱ्या हंचिनाळ तालुका निपाणी येथील गावात समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 4 हजार असून गाव अडी ग्रुप …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta