Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

हंचिनाळ येथे रयत संघटनेच्या शाखेचे उदघाटन

  कोगनोळी : हंचिनाळ (तालुका निपाणी) येथे रयत  संघटनेच्या ४३ व्या शाखेचे उदघाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते झाले. हंचिनाळ शाखाध्यक्ष मोहन नलवडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी बोलताना राजू पोवार म्हणाले, आम्ही गेली २० वर्षे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलने, मोर्चे याद्वारे अहोरात्र झटत आहोत. मात्र देशातील व राज्यातील सत्ताधारी …

Read More »

अनिश, अनन्या या भावंडांचे सागरी जलतरणात सुयश

  बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे जलतरणपटू अनिश पै आणि अनन्या पै यांनी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे मुंबई येथे आयोजित संक रॉक लाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतच्या सागरी जलतरण शर्यतीत विजय संपादन केला आहे. सदर शर्यतीच्या मुलांच्या विभागात होतकरू जलतरणपटू अनिश पै याने …

Read More »

‘चलो मुंबई’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती म. ए. समितीचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना

  बेळगाव (प्रतिनिधी) : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ‘चलो मुंबई’ मोर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार दि.२३ फेब्रुवारी रोजी दुपारी म. ए. समितीचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले. मोर्चाच्या पूर्वतयारीसह हे शिष्टमंडळ …

Read More »

खानापूर मलप्रभा नदी घाटावर स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाटावर आमवश्या, मंगळवार, शुक्रवार तसेच शिवरात्र आदी दिवशी भाविकांची स्नानासाठी, पुजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यावेळी भाविक नदी घाटावर पुजा करतात. पुजेवेळी नारळ फोडले जातात. पुष्पहार, केळी, तसेच प्लॅस्टिक पिशव्या मलप्रभा नदीच्या प्रवाहात सोडुन देतात. …

Read More »

खानापूर हेस्काॅम खात्याकडून नविन विद्युत खांब उभारून केली ग्राहकांची समस्या दूर!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हेस्काॅम खात्याकडून नुकताच ग्राहक मेळावा पार पडला. यावेळी अनेक ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी बेळगांव जिल्हा हेस्काॅम खात्याचे कार्यकारी अभियंते प्रवीण कुमार चिकोडे, खानापूर हेस्काॅम खात्याच्या अभियंत्या कल्पना तिरवीर तसेच सहाय्यक अभियंता श्री. रंगनाथ आदी उपस्थित होते. यावेळी ग्राहक मेळाव्यात खानापूर येथील शेतकरी जयराम …

Read More »

परीक्षाकाळात ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा! : सुराज्य अभियान

  सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परिक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसांतून पाच वेळा वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांकडून होणार्‍या ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भल्या पहाटेपासूनच रात्रीपर्यंत कर्कश्श आवाजात भोंगे वाजत असतात. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई …

Read More »

धामणे विभाग म. ए. समिती बळकट करण्याचा निर्णय

  बेळगाव : धामणे विभाग म. ए. समितीची कार्यकर्त्यांची गल्लीनिहाय बैठकीची पाचवी सभा बुधवार दि. 22/2/2023 संध्याकाळी 9 वाजता नवी गल्ली येथे झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. बाळू पायांना बेळगावकर हे होते. प्रारंभी बाळू जायनाचे यांनी स्वागत केले. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी धामणे विभाग महाराष्ट्र …

Read More »

एज्युकेशन फॉर निडी प्रकल्पांतर्गत शैक्षणिक मदत

  बेळगाव : सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या (एसएसएएफ) एज्युकेशन फॉर निडी प्रकल्पांतर्गत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जमा केलेला निधी नुकताच जोशी सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आला. जोशी सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापकांनी एसएसएएफच्या सीईओ प्रेमा पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक निधीचा धनादेश स्वीकारला. एसएसएएफचया एज्युकेशन फॉर निडी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 167 गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना …

Read More »

“शिवसन्मान” पदयात्रेचे गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद

  माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील व समिती नेते आर. आय. पाटील यांचा पदयात्रेत सहभाग बेळगाव : शिवाजी महाराजांसह भगव्या ध्वजाचा सन्मान राखण्याबरोबरच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “शिवसन्मान” पदयात्रेचे आज गुरुवारी सकाळी सुळगा गावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. छ. शिवाजी …

Read More »

शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी : मंत्री शोभा करंदलाजे

  बेळगाव : 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान किसान सन्मान निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली. बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे पंतप्रधान दौऱ्यासंदर्भात पूर्व तयारीची पाहणी केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी गुरुवारी (23 फेब्रुवारी) बोलत होत्या. हा …

Read More »