Thursday , April 23 2026
Breaking News

मुला -मुलींनी घेतले शिवकालीन युद्ध कला आणि संरक्षणाचे धडे

Spread the love

 

बेळगाव : श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट सव्यसाची गुरुकुलम आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाद्वार रोड विभाग 15 मे ते 25 मे या कालावधीत श्री कपिलेश्वर गणपती विसर्जन तलावच्या परिसरामध्ये पार पडले
या शिबिरामध्ये शिवकालीन युद्ध कला संरक्षण प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले याला मुला-मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
या शिबिरामध्ये लाठीकाठी, भाला, पट्टा, भारतीय व्यायाम, सूर्यनमस्कार, दंड बैठक, स्वसंरक्षक व ज्ञान प्रबोधन चिंतन वर्ग इत्यादी शिक्षण देण्यात आले. शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू असलेल्या प्राचीन मर्दानी युद्ध केले विषयी आवड निर्माण करणे, वीर वृत्ती निर्माण करणे, प्रतिकारशक्ती वाढविणे, चप्पल्य, व कौशल्य वाढविणे संरक्षणासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलींवर वेळप्रसंगी कोणत्याही वाईट वेळ आल्यावर स्वतःच्या जीवाचे रक्षण करता यावे आणि जमल्यास इतरांनाही अशा प्रसंगी मदत करू शकेल आधी उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्ट व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान महाद्वारोड विभाग आणि सव्यसाची गुरुकुलम आयोजित शिवकालीन युद्ध कला व संरक्षण प्रशिक्षण इच्छुक शाळा हायस्कूल महाविद्यालयांमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्याचे ध्येय ठेवले आहे
यावेळी प्रशिक्षक अंश महेश पेथानी, लखन भिमराव पोवार, अंनकुल फट्टू वरंडेकर गुरुवारी या शिबिराचा सांगता समारंभ कपिलेश्वर विसर्जन तलावर पार पडला. यावेळी बेळगाव मधील प्रसिद्ध लाटीपटू यांचा सत्कार करण्यात आला. परशुराम कुरणे, बाळू पुजारी, दामोदर पुजारी, पुंडलिक पाटील, राहुल मोरे, मलखांब प्रशिक्षक सागर लाखे आधी उपस्थित होते. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उदय शिंदे व हिरामणी मुचंडीकर यांचे मार्गदर्शन युवक आणि युवती न लाभले यावेळी मंदिराचे सर्व ट्रस्टी व सेवेकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रास्ताविक आणि आभार अभिजीत चव्हाण यांनी केले. हे शिबिर पार करण्यासाठी दौलत जाधव आणि राहुल कुरणे, विनायक किनेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

About Belgaum Varta

Check Also

स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

Spread the love  बेळगाव : बेळगाव न्यायालय परिसरात स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *