Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल सोसायटी एक विश्वासार्ह पतसंस्था

  बेळगाव : बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने गेल्या आपल्या 50 वर्षाच्या यशस्वी वाटचालीद्वारे एक विश्वासार्ह पतसंस्था म्हणून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदा 53 व्या वर्षी या सोसायटीला 89 लाख 59 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रातील विश्वासार्ह …

Read More »

महादेवाच्या पालखीची मिरवणूकीने समाधी मठाला भेट महाप्रसादाचे वाटप

निपाणी (वार्ता) : महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचा रथोत्सव मंगळवारी (ता.२१) पार पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.२२) सकाळी येथील महादेव मंदिरापासून उत्सव मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर समाधी मठात उत्सव मूर्तीची पूजा करून महाप्रसादाचे वाटप झाले. प्रारंभी महादेव मंदिराजवळ महोत्सव कमिटीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते उत्सव मूर्तीस पुष्पहार …

Read More »

पंतप्रधानांचा बेळगाव दौरा, दिलेली कामे वेळेत पूर्ण करा; मुख्य सचिव वंदिता शर्मा यांची सूचना

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव आणि शिवमोगा जिल्ह्यातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत, या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी प्रत्येक कार्यक्रम नीटपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी, अशा सूचना दिल्या. आज बुधवारी वंदिता शर्मा यांनी, पंतप्रधानांच्या राज्यातील बेळगाव आणि शिवमोगा दौऱ्यातील कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर …

Read More »

‘हर, हर महादेवा’च्या गजरात निपाणीत रथोत्सव

हजारो भाविकांची उपस्थिती : रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता निपाणी (वार्ता) : करडी ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांचा आकाशाला गवसणी घालणारा आवाज आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.२१) झाला. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत रस्ते फुलले होते. दुपारी ३वाजता रथात बसण्यासाठी सवाल …

Read More »

आयएएस अधिकारी सिंधूरी व आयपीएस अधिकारी रूपाची अखेर बदली

  वाद चव्हाट्यावर आणल्याचा परिणाम; अद्याप नवीन पोस्टींग नाही बंगळूर : सार्वजनिक भांडणाचा स्पष्ट परिणाम म्हणून, आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी आणि आयपीएस अधिकारी डी. रूपा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांना अद्याप कोणतेच नवीन पोस्टींग देण्यात आलेले नाही. वरिष्ठ आयएएस अधिकारी मुनीश मौदगील, जे रूपाचे पती आहेत, त्यांचीही …

Read More »

राजकारणासाठी छत्रपतींचा वापर करणाऱ्यांना “शिवसन्मान” पदयात्रेने चोख प्रत्युत्तर

  बेळगाव : केवळ राजकारणा पुरता छ्त्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणाऱ्या राष्ट्रीय पक्षातील नेते मंडळींना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी याची सुरुवात किल्ले राजहंसगडावरून होणार आहे, असे मत समिती नेते रमाकांत कोंडूस्कर यांनी व्यक्त केले. माजी महापौर आणि मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी किल्ले राजहंसगड ते बेळगाव रेल्वे स्थानकापर्यंत काढण्यात येणाऱ्या “शिवसन्मान” …

Read More »

एंजल फाउंडेशनकडून असह्य वृद्ध महिलेला मदतीचा हात!

  बेळगाव : एका निराधार आणि असह्य वृद्ध महिलेला मदतीचा हात देऊन एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी वडगाव येथील एका सुमन या आजीबाईला एका महिन्याचे किराणा सामान आणि त्यांचे घर भाडे देऊन आर्थिक मदत केली आहे. वडगाव येथील एक वृद्ध महिलेच्या मुलगा हृदयविकाराच्या तीव्र …

Read More »

शहरात गांजा, पन्नी अमली पदार्थ विक्रेत्यांवर करावी कारवाई

  बेळगाव : बेळगाव शहरात शैक्षणिक संस्थांच्या परिसराच्या आजूबाजूला गांजा, पन्नी यासारखे अवैध धंदे सुरू असून असे बेकायदेशीर कृत्य विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घातक ठरत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जय कर्नाटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय रजपूत यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या संदर्भात जय कर्नाटक संघटनेने आंदोलन छेडले. यावेळी बोलताना संजय रजपूत …

Read More »

अमेरिकेचे खासदार श्री. ठाणेदार यांच्या बेळगाव येथे भव्य नागरी सत्काराचे आयोजन

  बेळगाव : मूळचे बेळगावचे सुपुत्र व सध्या अमेरिका देशाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. श्री. ठाणेदार यांचा गुरुवार दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठिक 5.00 वाजता मराठा मंदिर बेळगावच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. या नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव होते. खासदार श्री. ठाणेदार शामल …

Read More »

“शिवसन्मान” पदयात्रेला तालुका समितीचा पाठिंबा

  बेळगाव : छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ तसेच मराठी माणसांची एकजुटीची ताकद दाखवण्याबरोबरच मराठी संस्कृती अस्मिता आणि स्वाभिमान जपण्यासाठी येत्या 22 ते 26 फेब्रुवारीपर्यंत आयोजीत “शिवसन्मान” पदयात्रेला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठिंबा दिला आहे. शिवसन्मान पदयात्रेसंदर्भात सदर यात्रेचे नेतृत्व करणारे समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आज मंगळवारी बेळगाव तालुका म. …

Read More »