Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी संपुष्टात

Spread the love

 

लवकरच नविन पदाधिकारी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी येत्या काही दिवसांत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे खानापूर शहरातील नगरसेवकातुन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षासाठी कोणते आरक्षण येणार याची चर्चा जोरदार सुरू आहे.
येत्या दोन वर्षे सहा महिन्यासाठी नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी राहणार आहे.
मागील दोन वर्षे सहा महिन्यात मजहर खानापूरी व तसेच नारायण मयेकर या नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला. तर उपनगराध्यक्षाचा अडीच वर्षाचा मान लक्ष्मी अंकलगी यांनी सांभाळला.
आता पुढील अडीच वर्षाचा कालावधीत कोण नगराध्यक्ष व कोण उपनगराध्यक्षाचा मान मिळविणार याकडे खानापूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या २० नगरसेवकातूनही नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाची रस्सीखेच सुरू होणार आहे.
मागील वेळेला खानापूर मतदारसंघात काँग्रेसचा आमदार होता. सध्या खानापूर मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. याचा उपयोग नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या पदाच्या निवडीसाठी होणार? अशी चर्चाही खानापूर शहरातील नागरिकांतून होताना दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *