Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

कंग्राळ गल्लीत उद्या श्री वेताळ देवस्थान वार्षिक पूजा उत्सव

  बेळगाव : शहरातील कंग्राळ गल्ली येथील श्री वेताळ देवस्थानचा वार्षिक पूजा उत्सव उद्या रविवार दि. 25 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केला असून भाविकांनी याची नोंद घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. कंग्राळ गल्लीतील श्री वेताळ देवस्थानचा वार्षिक पूजा उत्सवानिमित्त उद्या रविवारी सकाळी 7 वाजता लघुरुद्राभिषेक व पुण्याहवाचन …

Read More »

कृषी दिनानिमित्त 5 शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार

  बेळगाव : बेळगाव कृषी विभागाच्यावतीने कृषी दिनानिमित्त प्रगतशील व सेंद्रिय शेती करणाऱ्या 5 शेतकऱ्यांचा तालुकास्तरीय कृषी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. भारताचे 5 वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा 23 डिसेंबर हा जन्म दिन देशभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. माजी पंतप्रधान कै. चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव कृषी विभागातर्फे …

Read More »

नागनाथ मंदिरात पाच लाख किंमती ऐवजाची धाडसी चोरी

  बेळगाव : बेकिनकेरे येथील ग्रामदैवत श्री नागनाथ देवस्थान येथील काल शुक्रवारी रात्री पाच लाख रुपयाची धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थ व देवस्थान कमिटी तसेच देवस्थानच्या भक्तांकडून या प्रकरणामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सहा वर्षात नागनाथ मंदिरात तिसऱ्या वेळी चोरीची घटना घडली असून यापूर्वी मंदिरातील तांब्याच्या वस्तूंची चोरी …

Read More »

चीनसह पाच देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

  नवी दिल्ली : चीन आणि शेजारील देशांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असेल. जर या देशांतून आलेल्या कोणत्याही प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यास अथवा त्यांची कोविड १९ …

Read More »

श्री गाडगेबाबा गौरव पुरस्काराने सुरेंद्र अनगोळकर सन्मानित

  बेळगाव : मराठा रजक समाज बेळगाव या संस्थेतर्फे सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक समाजसेवक अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल ‘श्री गाडगेबाबा गौरव पुरस्कार’ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. शहापूर हुलबत्ते कॉलनी येथील श्री गाडगेबाबा भवन येथे मराठा रजक समाजातर्फे गेल्या मंगळवारी श्री संत गाडगेबाबांची 66 वी पुण्यतिथी …

Read More »

कोल्हापूर येथील धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

  तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार  बेळगाव : कर्नाटक सरकारने येथील म. ए. समितीचा मेळावा होऊ दिला नाही. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कर्नाटकने केले असून त्याविरोधात आता कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि. 26 रोजी धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोठ्या संख्येने म. ए. समितीच्या …

Read More »

दिग्विजय युथ क्लब मण्णूरतर्फे प्रीमियर लीग सिझन-४ उत्साहात

  बेळगाव : दिग्विजय युथ क्लब मण्णूरतर्फे मण्णूर प्रीमियम लीग सिझन – ४ चे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. १८ डिसेंबर रोजी मण्णूर येथील छत्रपती शिवाजी मैदानावर या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते आर. एम. चौगुले आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्याहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या …

Read More »

कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठानच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन

  बेळगाव : मण्णूर येथील कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेसाठी अनेक विधायक कार्य करणाऱ्या संघाच्या माध्यमातून सहकार्याच्या भावनेतून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव परिसरातील …

Read More »

सीमावादावर पंतप्रधान मध्यस्थी करणार!

  दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे आश्वासन ; खा.धैर्यशील माने यांची माहिती नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा वाद आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरबारी पोहोचला. खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्यांमुळे सीमाभागात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, …

Read More »

महाराष्ट्राच्या विधानसभेत कर्नाटक विरोधी प्रभावी प्रस्ताव आणणार : शंभूराज देसाई

  नागपूर : कर्नाटक सरकारपेक्षाही प्रभावी प्रस्ताव आणणार आहोत, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद समन्वय समितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी विधान भवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना दिली. शंभूराज देसाई पुढे म्हणाले, विधानसभेच्या विद्यमान सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे शोक प्रस्ताव आज सभागृहात मांडण्यात आला. शोक …

Read More »