Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

बोरगाव बस स्थानकात महिलेचा दीड लाखाचा ऐवज लंपास

चार तोळ्यांचे सोन्याच दागिने : सदलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  निपाणी (वार्ता) : कुरुंदवाडहून आजराकडे जात असताना बोरगाव बस स्थानकावर महिलेची पर्स मधील सुमारे दीड लाख किमतीचे चार तोळ्यांचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना उघडकीस येताच संबंधित महिलेने आक्रोश केला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रेश्मा अस्लम शेख या गृहिणी …

Read More »

भूकंपामध्ये 50 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचावकार्य सध्या अंतिम टप्प्यात

  तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा 34,000 च्या पुढे पोहोचला असून 80 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तुर्कीमध्ये 6 फेब्रुवारी रोजी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. यानंतरही भूकंपाचे अनेक धक्के बसले. यामुळे तुर्कीतील दहा शहरं उद्ध्वस्त झाली …

Read More »

भारताने पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या, सात विकेट्सने दणदणीत विजय

  केपटाऊन : भारतीय संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २०षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. जेमिमाह …

Read More »

धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती बैठक आज

  बेळगाव : धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या संयोजनातुन महाराष्ट्र एकीकरण समिती धामणे विभाग रचना संदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे. तरी धामणे विभागातील ब्रह्मलिंगहट्टी, मासगोंडहट्टी, देवगनहट्टी येथील सर्व कार्यकर्त्यांनी मराठी भाषिकांनी बसवाना मंदिर धामणे येथे सोमवार दिनांक 13 रोजी संध्याकाळी ठीक 8:00 वाजता बैठकीला उपस्थित राहायचे आहे, अशी कळकळीची …

Read More »

वैजनाथ देवस्थान देवरवाडी नूतन स्थानिक सल्लागार उपसमितीकडून मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

  देवरवाडी : श्री वैजनाथ देवालय देवरवाडी ता.चंदगड येथे दि.१८ रोजी होणाऱ्या महाशिवरात्र महोत्सवाचे निमित्त साधून आज रविवार दि. १२/२/२०२३ रोजी नूतन वैजनाथ स्थानिक सल्लागार उपसमितीकडून मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंदिर परिसरातील गवत, झुडपे, पालापाचोळा, स्वच्छ करून नूतन सल्लागार समितीने एक वेगळा आदर्श निर्माण केला. या स्वच्छता मोहिमेत …

Read More »

पिरनवाडी येथे म. ए. समितीची उद्या बैठक

    बेळगाव : पिरनवाडी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सोमवार दिनांक १३ रोजी सायंकाळी ६-०० वाजता रामदेव गल्ली येथील राम मंदिर येथे बैठक बोलाविण्यात आली असून बाळगमट्टी, खादरवाडी, मच्छे, मजगाव, झाडशहापूर, अनगोळ येथील स्थानिक नेते तसेच …

Read More »

19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त घरावर भगवा लावा; रमाकांत कोंडूस्कर यांचे आवाहन

  बेळगाव : स्वाभिमानाचे, शौर्याचे प्रतीक समजला जाणारा भगवा प्रत्येकाने आपल्या घरावर अभिमानाने फडकवावा. येत्या 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा जन्म दिवस शिवजयंती म्हणून साजरी केली जाते. हा दिवस प्रत्येक हिंदूंनी मराठी माणसांनी सण म्हणून साजरा केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आज आपण हिंदू राष्ट्रात …

Read More »

यरमाळ रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस

  बेळगाव : वडगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यरमाळ रोड परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यरमाळ रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीचा चावा घेतला आहे. मागील आठवड्यात वडगाव स्मशानभूमीजवळ कुसाणे नामक व्यक्तीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला व त्यांचे …

Read More »

“चलो मुंबई”च्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री देसाई यांची भेट

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज रविवारी सकाळी पाटण येथे महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारीचा नियोजित ‘चलो मुंबई’ मोर्चा आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील विविध ताज्या घडामोडींबद्दल चर्चा केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर …

Read More »

हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

  बेळगाव : शहापूर येथील रहिवासी गीता भरमा कोळेकर या 37 वर्षीय मध्यमवर्गीय विवाहितेच्या जीविताच्या हितासाठी तिच्यावर रिडो टीव्ही रिप्लेसमेंट (ओपन हार्ट सर्जरी) शस्त्रक्रियेची अत्यंत गरज असून त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. गीता भरमा कोळेकर यांना खुल्या हृदय शस्त्रक्रियेसाठी (ओपन हार्ट सर्जरी) आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांचे पती …

Read More »