मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये …
Read More »किटवाड धबधब्यात पडून चार तरुणींचा मृत्यू
बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या किटवाड धबधब्यावर बेळगावहून सहलीला गेलेले चार विद्यार्थी घसरून पडल्याची धक्कादायक घटना घडली. बेळगाव येथील मदरसा शाळेत शिकणारे 35 हून अधिक विद्यार्थी आज सहलीसाठी किटवाड येथे गेले होते. यावेळी सेल्फी काढताना पाच तरुणी खाली पडल्या. पाच तरुणींपैकी चौघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असून …
Read More »कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस अडवल्या, सीमाभागात तणाव
सोलापूर : मागच्या चार दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील 40 गावे आमच्याकडे येणार असल्याचे खळबळजणक वक्तव्य केले. यावरून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. यानंतर पुन्हा कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरही आमचाच भाग असल्याचे सांगितले. यावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. याचा परिणाम आता सामान्य नागरिकांना भोगावा …
Read More »मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे 8 जानेवारीला निकाली कुस्त्यांचे मैदान
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडी कुस्ती आखाड्यात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. कुस्ती आखाड्याचे उद्घाटन रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते होणार आहे, तर पूजनाची कुस्ती मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे. …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जाहीर आवाहन!
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि 28 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या मोर्चाला मध्यवर्ती म. ए. समितीने पाठिंबा व्यक्त केला आहे. रिंगरोडच्या नावाखाली 32 गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत आहे. या जमिनी वाचविण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. …
Read More »राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर (जिमाका) : शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हीत जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रींडांगणावर आयोजित केलेल्या शेतकरी जनसंवाद …
Read More »सागरी जलतान स्पर्धेत आबा व हिंद क्लबचे जलतरणपटू चमकले
स्मरण व धवल यांना सुवर्णपदके बेळगाव : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या वतीने विजयदुर्ग येथे सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन श्री दुर्गा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग वाघोटन खाडीवरती पाच, तीन व दोन किलोमीटर मुले, मुली आणि मास्टर्स गट याशिवाय …
Read More »कोगनोळीजवळ दोन लाखाचे अफीम जप्त
धाबाचालक गजाआड : अबकारी खात्याची कारवाई कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी हद्दीतील आरटीओ कार्यालयाजवळ धाब्यातून विक्री होणारे सुमारे 2 लाख रुपये किमतीचे 35 किलो अफीम जप्त करण्यात आले. बेळगाव व चिकोडी विभागाच्या अबकारी विभागाने संशयित धाबाचालक गिरधरसिंह किशोरसिंह राजपुरोहित (वय 41) राहणार इस्पुरली सावंतवाडी याला अटक केली. …
Read More »देशाच्या सुरक्षेमध्ये जवानांचे योगदान महत्त्वाचे
युवा नेते उत्तम पाटील : ममदापुर येथे अरिहंत उद्योग समूहकडून योध्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाने क्षेत्रातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा नेहमीच सन्मान केला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी युवकांनी स्वतःला सैन्य दलात समावुन घेणे ही काळाची गरज आहे. योध्यांची सेवा ही देशासाठी अनमोल आहे, असे मत …
Read More »खानापूर नगरपंचायतीचे नुतन चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांनी पदभार स्विकारला
खानापूर (प्रतिनीधी) : खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने याची बढतीनिमित्त चिकोडी येथे बदली झाली. त्यामुळे खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर पद रिक्त होताच, त्याच्या जागी विजापूर येथून बढतीनिमित्त खानापूर चीफ ऑफिसर म्हणून आर. के. वटारे यांची वर्णी लागली. लागलीच त्यांनी चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांच्याकडून कामाची सुत्रे हाती घेतली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta