Sunday , September 20 2026
Breaking News

हेस्कॉम विरोधातील धरणे आंदोलन लांबणीवर

Spread the love

 

बेळगाव : सिंगल फेज वीजपुरवठ्याबाबत शुक्रवारी (ता. १०) आयोजित धरणे आंदोलन लांबणीवर टाकण्यात आले आहे. मच्छे विभागातील संतिबस्तवाड, वाघवडे, झाडशहापूर, मच्छे, बाळगमट्टी, पिरनवाडी, किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले शिवारात रात्रीच्यावेळी सिंगल फेज वीजपुरवठा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्यामुळेच शुक्रवारी (ता. १०) मच्छे येथील हेस्कॉम कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांनी शेतकरी प्रतिनिधी व हेस्कॉम अधिकाऱ्यांत चर्चा घडवून आणली. यावेळी हेस्कॉम ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीणकुमार चिकार्डे यांनी चार दिवसांची मुदत मागून घेतल्यामुळे नियोजित धरणे आंदोलन लांबणीवर टाकण्यात आले आहे. येत्या चार दिवसांत मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढील तारीख कळविण्यात येईल. याची सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *