खानापूर : दोन गटात विखुरलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत अखेर मध्यवर्तीच्या पुढाकाराने एकी झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठी भाषिकांनी एकत्र येऊन मराठीची ताकद दाखवून देण्यासाठी मध्यवर्तीने खानापूर समितीमध्ये एकी करण्याचा निर्धार केला. त्याअनुषंगाने आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवस्मारक येथे दोन्ही गटात …
Read More »आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते 1.75 कोटी खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कुवेंपू नगर येथील आझाद हौसिंग सोसायटी वसाहत व परिसरातील गटारी आणि रस्ते सुधारण्यासाठी बेळगाव महापालिकेकडून 1.75 कोटी रु. प्राप्त झाले आहेत. आज बुधवारी स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून सदर कामांचा शुभारंभ करण्यात आला. आ. लक्ष्मी हेब्बाळकर पायाभूत सुविधांच्या …
Read More »शिक्षक संघटनेचा २३ रोजी बंगळुरू येथे मोर्चा
शिक्षकांच्या विविध मागण्या : सहभागी होण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघटनेच्या निपाणी तालुका विभागातर्फे बंगळूर येथे विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. २३) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन तालुका अध्यक्षअध्यक्ष टी. बी. बेळगली यांनी केले आहे. संघटनेच्या आयोजित बैठकीत त्यांनी ही …
Read More »निपाणी सद्गुरु हॉस्पिटलतर्फे विठ्ठल पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन मॅक (कागल फाईव्ह स्टार कागल-हातकणगले औद्योगिक वसाहत) या संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्यात ऑननरी सेक्रेटरी पदावर सौंदलगा – कागल येथील उद्योजक विठ्ठल ईश्वर पाटील (कागल) यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल निपाणी येथील सद्गुरु हॉस्पिटलतर्फे डॉ. उत्तम पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला. निपाणी …
Read More »ऊरूसाच्या तिसऱ्या दिवशी भाविकांना खारीक – उदीचा प्रसाद
निपाणी : सर्व धर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक हजरत दस्तगीर साहेब यांच्या ऊरूसाच्या तिसऱ्या दिवशी ८ रोजी पहाटे निपाणी येथे दर्गाहचे संस्थापक श्री संत बाबा महाराज चव्हाण यांच्या चव्हाण वारसातर्फे मानाचा निशाण व गलेफ संग्रामसिंह देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, नवनिहालकर सरकार, दादाराजे देसाई – निपाणकर सरकार यांच्या हस्ते लवाजमा …
Read More »संजय राऊतांना जामीन मंजूर
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं …
Read More »कोरे गल्ली, जेड गल्ली येथील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
बेळगाव : कोरे गल्ली, जेड गल्ली येथील सामाईक रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून 15 दिवसातून एकदा कचऱ्याची उचल होते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांना सामना करावा लागत आहे, महानगर पालिकेने लक्ष देऊन नागरिकांना कचरा बाहेर न टाकण्याची समज द्यावी आणि औषधांची फवारणी गेले वर्षभर झाली नाही ती करावी, असे …
Read More »नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का, ६ जणांचा मृत्यू; दिल्लीमध्ये हादरे
नवी दिल्ली : नेपाळमध्ये बुधवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील डोटी जिल्ह्यात काही घरेदेखील पडली आहेत. ६.३ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचे हादरे राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही बसले आहेत. नेपाळमधील डोटी जिल्ह्यामध्ये पहाटेच भूकंप झाल्याची घटना घडली. या भूकंपात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला …
Read More »माजी आमदारांकडून शक्तिप्रदर्शनाचा अयशस्वी प्रयत्न!
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावर आमदारकी भूषविलेल्या खानापूर तालुक्यातील एका माजी आमदारांचा उद्या मुख्यमंत्री बोम्माई यांच्यासमोर शक्तिप्रदर्शनाचा केविलवाणा प्रयत्न अपयशी ठरला आहे. सध्या भाजपवासीय असलेल्या माजी आमदारांनी खानापूर तालुक्यातील मणतुर्गे येथील कट्टर समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत काढलेला एक फोटो सध्या समाजमाध्यमाद्वारे सर्वत्र फिरत आहे. त्यांच्यासोबत मणतुर्गे येथील समितीनिष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपात …
Read More »खानापूरात मुख्यमंत्र्याच्या होणाऱ्या आगमनाने जांबोटी क्राॅसवरील रस्त्याचे काम मार्गी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील अग्रीकल्चर कार्यालयासमोर रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्यावर सीडीचे अर्धवट काम झाले होते. त्यामुळे जांबोटी क्राॅसवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र प्रथमच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे बुधवारी दि. ९ रोजी खानापूर दौऱ्यावर येत असल्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta