Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

ऊस दराबाबत ‘आप’ स्वाभिमानीचे हालसिद्धनाथला निवेदन

चार दिवसाचा अल्टिमेट : अन्यथा आंदोलन निपाणी (वार्ता) : आम आदमी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आम आदमी पक्षाचे निपाणी विभाग प्रमुख डॉ. राजेश बनवन्ना म्हणाले, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालणारा कारखाना आहे. त्याचा सर्व शेतकऱ्यांना …

Read More »

भरतेश ट्रस्टतर्फे चंदन होसूर व तारिहाळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

  बेळगाव : भरतेश आदर्श ग्राम सेवा या योजना अंतर्गत रविवार 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी उच्च प्राथमिक शाळा, चंदन होसूर येथे मेगा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबीरमध्ये 400 हून अधिक गावकऱ्यांनी तज्ञ डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी केली. भरतेश एज्युकेशन ट्रस्ट (BET) च्या हीरक महोत्सवी …

Read More »

निपाणीतील शर्यतीत सचिन काटकर यांची बैलगाडी प्रथम

विठ्ठल नाईक यांची बैलगाडी द्वितीय : शर्यती शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब दर्ग्याच्या उरसानिमित्त सोमवारी येथील आंबेडकर नगर मध्ये आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत निपाणीच्या सचिन काटकर यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजार १ रुपयांचे बक्षीस व ढाल मिळवले. ननदी येथील विठ्ठल नाईक यांच्या …

Read More »

उद्योजक मेळाव्या संदर्भात मराठा सेवा संघ बेळगावची बैठक संपन्न

  बेळगाव : काल सोमवार दि. 7/11/2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता मराठा सेवा संघ बेळगांवची बैठक मराठा सभागृह, गणेश कॉलनी छत्रपती संभाजी नगर वडगांव बेळगांव येथे संपन्न झाली. बैठकी मध्ये मराठा उद्योजक, व्यवसायिक, व्यापारी आणि ग्राहक मेळावा बेळगांवमध्ये घेण्यासाठी चर्चा करून मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्याचे ठरले. बैठकीमध्ये मराठा सेवा …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीच्या भूमिकेमुळे सीमावासीयांत नवचैतन्य!

  बेळगाव : 2018 पासून दोन गटात विखुरलेली खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या काही महिन्यांपासून समितीमधील निष्ठावंतांनी एकीची प्रक्रिया चालू केली होती. मात्र काही नेत्यांच्या आढमुठेपणामुळे एकीची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. समिती बळकट करण्यासाठी एकी करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे तालुक्यातील समितीप्रेमी जनतेच्या मागणीवरून मध्यवर्ती …

Read More »

अमेरिकेत होणाऱ्या कार्यशाळेसाठी सुभाष भादुले यांची दहाव्यांदा निवड

निपाणी (वार्ता) : बुदिहाळ येथील विमा प्रतिनिधी सुभाष सदाशिव भादुले यांची सलग दहाव्या वेळी अमेरिका येथे होणाऱ्या नॅशनल टेनेस्सी या जागतीक दर्जाच्या सेमिनारसाठी एमडीआरटी क्लब सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे ते सेमीनारसाठी जाण्यास पात्र ठरले आहेत. सेमीनार पात्रतेसाठी सुभाष भादुले यांनी आपल्या विमा क्षेत्रामध्ये विमा ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सेवा …

Read More »

गीता राऊत, पूजा शिंदे यांचा साळुंखे गारमेंटतर्फे सन्मान

निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरमधील साळुंखे गारमेंटचा सातवा वर्धापन दिन पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून कॅनरा बँकेचे व्यवस्थापक गंगाप्पा उपस्थित होते. प्रारंभी विनोद साळुंखे यांनी स्वागत केले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांना सातवा वेतन वाटप करण्यात आला. साळुंखे गारमेंट यंदाचा बेस्ट ऑपरेटरचा पुरस्कार  साखरवाडीमधील गीता राऊत यांनी पटकावला. तर बेस्ट हेल्पर …

Read More »

राज्यातील प्रत्येकी तीन जिल्ह्यांमध्ये एसडीआरएफची तुकडी

गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांची माहिती बंगळूर : राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक तीन जिल्ह्यांमध्ये एक एसडीआरएफ पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले . राज्य नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि एसडीआरएफ संचालनालयाच्या जवानांना राजभवन येथे राष्ट्रपती पदक प्रदान समारंभात ते बोलत होते, ज्यांनी आपल्या प्राणांची …

Read More »

मतभेद बाजूला ठेवून २०२३ च्या निवडणुकीला सामोरे जा

  खर्गे यांचा पक्षातील नेत्यांना सल्ला, अभिनंदन मेळाव्यात मोठी गर्दी बंगळूर : एआयसीसीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन एम. खर्गे यांनी रविवारी सायंकाळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना, मतभेद बाजूला ठेवून २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचे स्पष्ट आवाहन केले. भाजपमध्ये देखील आपापसात ऐक्याचा अभाव असल्याचे सांगून कॉंग्रेस पक्षातही मतभेद असल्याचे …

Read More »

दहा हजार दिव्यांनी उजळले महादेव मंदिर

कार्तिक दीपोत्सवानिमित्त कार्यक्रम : महादेवाची पालखी प्रदक्षिणा निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीत मधील महादेव मंदिरात सोमवारी (ता.७) रात्री कार्तिक दीपोत्सव साजरा झाला. त्यानिमित्त महादेव मंदिर सह सांस्कृतिक भवनात भाविकांनी दहा हजार दिवे लावले. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. त्यावेळी रेखाटलेल्या रांगोळ्या दीपोत्सवाचे खास आकर्षण ठरले. प्रारंभी महादेवाच्या पालखीची प्रदक्षिणा …

Read More »