बेळगाव : मतिमंदांच्या उत्कर्षासाठी समाजातील प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. लहान मुले म्हणजे देवघरची फुले असे आपण मानतो. त्याचप्रमाणे मतिमंद मुले देखील देवाची मुले असे समजून त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागले पाहिजे. त्यांनाही आपल्या कुटुंबाचा एक भाग मनाला पाहिजे, असे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. …
Read More »ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रऊफखांन पठान यांना राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार हैद्राबाद येथे प्रदान
डिचोली : डिचोली येथील राधाकृष्ण विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. रऊफखांन पठान यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील “अविष्कार फॉउंडेशन इंडिया” संस्थेतर्फे राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार हैद्राबाद येथे प्रदान सोहळा संपन्न झाला. हा पुरस्कार काल रविवार दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी हैद्राबाद येथील सालारजंग म्युझीयम सभागृहात एका शानदार कार्यक्रमात …
Read More »दिवाळीनिमित्त प्रातःकालीन गायन मैफिलीचे 23 ऑक्टोबरला आयोजन
बेळगाव : आर्ट्स सर्कल बेळगांव तर्फे सालाबादप्रमाणे रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ६:०० वाजता दिवाळीनिमित्त प्रातःकालीन गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही मैफील रामनाथ मंगल कार्यालय, पहिला क्रॉस, भाग्यनगर येथे सादर होईल. सदर मैफिलीमध्ये सर्व रसिकांना प्रवेश मुक्त आहे. यावर्षी पं. आनंद भाटे यांच्या गायनाचा आनंद …
Read More »अंकुरम शाळेत ‘कमवा आणि शिका’चा उपक्रम
विद्यार्थ्यांनी बनवल्या दिवाळीचे साहित्य : खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद निपाणी (वार्ता) : कोडणी – निपाणी येथील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘कमवा आणि शिका’ या उपक्रमांतर्गत मुलांना खास दिवाळी निमित्त विविध आकर्षक वस्तू बनवून गुरुवारच्या आठवडी बाजारात त्यांची विक्री केली त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. शाळेच्या या उपक्रमाचे शहर आणि परिसरातून …
Read More »बेळगाव येथील विद्यार्थ्याची मुचंडीजवळ निर्घृण हत्या
बेळगाव : छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवाशी असलेल्या हायस्कूलच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावच्या शिवारात घडली आहे. काल रात्री एका विद्यार्थ्याची हत्या करून अज्ञात मारेकर्यांनी मुचंडी गावाबाहेर त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे आज गुरूवारी उघडकीस आले. बेळगावच्या छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवासी असलेल्या प्रज्वल शिवानंद करिगार …
Read More »यशस्वी उद्योजक होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक : राजीव दोड्डन्नवर
बेळगाव : जीवनात यशस्वी उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम केले पाहिजेत. त्यांनी सतत बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे, असे मत भारतेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नवर यांनी व्यक्त केले. नुकतेच भारतेश एज्युकेशन ट्रस्टच्या ग्लोबल बिझनेस स्कूलने M.B.A. 2020-2022 च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांच्या पदवी दिन आणि समापन समारंभाचे उद्घाटन करताना ते …
Read More »पुस्तकांच्या वाचनाने जीवनाला उभारी
प्रा. नानासाहेब जामदार : अर्जुनी वाचनालयात गुणवंतांचा सत्कार निपाणी (वार्ता) : वाचन हा जीवनातील अविभाज्य घटक असला पाहिजे. वाचनातून मिळणारे ज्ञान कुठेच मिळत नाही. हताश व निराश झालेल्या जीवाला उभारी देण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तके जगण्याची उर्मी देतात. यासाठी प्रत्येकाने दिवसातील थोडा वेळ वाचनासाठी दिला पाहिजे, असे प्रतिपादन देवचंद …
Read More »कोगनोळी बिरदेव मंदिरात भाविकांची गर्दी
शनिवारी पहाटे मुख्य भाकणूक : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा व शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त मंदिराचे रंगकाम व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंगळवार तारीख 18 रोजी मानकरी, …
Read More »करंबळ गावच्या नितीन पाटील याचे शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये यश
खानापूर (प्रतिनिधी) : इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन ऑफ बेळगाव टीमचा खेळाडू व करंबळ (ता. खानापूर) गावचा सुपूत्र नितीन पाटील याने राज्य पातळीवर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये खानापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करत तीन गोल्ड मेडल जिंकून खानापूरच्या नाव लौकिकात भर टाकली आहे. नुकताच सप्टेंबरमध्ये चित्रदुर्ग, हुईना, व शिमोगा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये …
Read More »खानापूर चिरमुरकर गल्लीतील मराठी शाळेत पेव्हर्स कामाचा शुभारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील उच्च प्राथमिक मराठी मुलांची व उच्च प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेच्या पटांगणात एमएलसी हणमंत निराणी यांच्या फंडातून पेव्हर्स बसविण्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, एसडीएमसी अध्यक्ष धाकटा गुरव, भाजप तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta