Sunday , July 26 2026
Breaking News

सांबरा आखाडा 12 फेब्रुवारी रोजी; पै. कार्तिक काटे – पै. सुदेश ठाकूरमध्ये प्रमुख लढत

Spread the love

 

बेळगाव : सांबरा ग्रामस्थ आणि कुस्ती कमिटीच्यावातीने आयोजित कुस्ती आखाड्याच्या तारखेत बदल झाला असून दि. 5 ऐवजी रविवार दि 12 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती मैदान भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथम क्रमांकाची लढत डबल कर्नाटक केसरी पै.कार्तिक काटे विरुद्ध मध्यप्रदेश केसरी पै. सुदेश ठाकूर यांच्यात होणार आहे.
दोन नंबरची कुस्ती कर्नाटक केसरी पै.नागराज बसुडोणी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. श्रीमंत भोसले यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची लढत कर्नाटक केसरी पै. संगमेश बिरादार विरुद्ध पै.शुभम कोळेकर(ता. गंगावेस, कोल्हापूर) यांच्यात होणार आहे.
4) पै. कीर्तिकुमार (कंग्राळी खु ) वि पै. सुनील कवठेपिरान,
5) पै. विशाल शेळके (सांगली) वि. पै.रोहित (कंग्राळी खु),
6) पै. विक्रम (शिनोळी) वि पै.प्रताप ठाकूर (सांगली),
7) पै. पवन चिकदिनकोप वि. पै. प्रेम (कंग्राळी खु),
8) पै. रुपेश जाधव (कोल्हापूर) वि. गुथाप्पा (दावणगेरी)
9) पै. प्रवीण (निलजी) वि. पै. महादेव दऱ्याण्णावर,
10) पै. विक्रम (तुर्केवाडी) वि. पंकज (चापगांव),
11) पै. हणमंत (गंधिगवाड) वि. पै. संकल्प (कंग्राळी खु) यांच्यासह 60 हून अधिक चटकदार कुस्त्या होणार आहेत.
विमानतळ नाजिकच्या मैदानावर आखाडा होणार आहे. मैदान यशस्वी करण्यासाठी सांबरा कुस्ती कमिटी परिश्रम घेत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *