बेळगाव : येळ्ळूर येथील सामाजिक आणि म. ए. समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते, ता. पं. माजी सदस्य रावजी महादेव पाटील यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या रविवार दि. 8 रोजी सकाळी 11 वा. मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिजजवळ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर राहणार आहेत.
प्रमुख वक्ते निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे, अ. भा. मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, मार्कंडेय साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार, सेवानिवृत्त शिक्षक दाजिबा पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अमृतमहोत्सव सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे.