सौदलगा : सौदलगा सरकारी मराठी मुलांच्या शाळेत जुलै आणि ऑगष्ट महिण्याच्या पहिल्या आठवड्यात पालक सभा आनंदात आणि खेळीमिळीत पार पडली. सभेचे विषय अध्ययन पुनर्प्राप्ती, विद्याप्रवेश, विद्यार्थ्याना आरोग्यविमा पॉलिसी, युनिफॅार्म, अंडी, केळी आणि चिक्की मोफत वितरण, अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. प्रथम मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी स्वागत आणि सभेची प्रस्तावना …
Read More »संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार; जामीन मिळणार?
मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटक केलेल्या संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी राऊतांना जामीन मिळणार की कोठडी? याकडे लक्ष लागून राहिले असून, ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊतांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे. यापूर्वीच्या …
Read More »पणजी-कोल्हापूर बस कणकवली स्थानकात रोखली, एसटी कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप
सिंधुदुर्ग : एसटी कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात गेल्यावर दुय्यम पद्धतीची वागणूक देत असल्याचा आरोप करत आज पणजी-कोल्हापूर बस कणकवली स्थानकात रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर एसटी डेपो मॅनेजर यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत तब्बल एक तास ही बस थांबवून ठेवली होती. एसटी विभागात कोल्हापूर विरुध्द सिंधुदुर्ग कर्मचाऱ्यां मधील वाद चव्हाट्यावर …
Read More »सोळा वर्षांच्या मुलाचा प्रामाणिकपणा!
कोगनोळी : येथील सार्थक दिनकर माने या सोळा वर्षीय विद्यार्थ्यांला सापडलेले चार हजार रुपये प्रामाणिकपणे परत केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. आजच्या जमान्यात मिळालेली रक्कम व वस्तू परत मिळणे फार दुर्मिळ झाले आहे. अनेक वेळा पैसे व वस्तू गहाळ झाल्यास मिळणे कठीण असले तरी जगातील सर्वच प्रामाणिक …
Read More »भाजप सरकारकडून समाजातील शांतता आणि सलोखा नष्ट : राहुल गांधी
सिध्दरामोत्सवात कॉंग्रेसला साथ देण्याचे आवाहन बंगळूरू : राज्यातील भाजप सरकार समाजातील शांतता आणि सलोखा नष्ट करत असून लोकांमध्ये फूट पाडत असल्याची टीका अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे नेते राहुल गांधी यांनी केली. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या दावनगेरे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की काँग्रेस सरकारच्या काळात …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक
खानापूर : उद्या तारीख 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक या ठिकाणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मध्यवर्ती समितीच्या वतीने सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत यासाठी व कन्नड सक्ती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी पाच पर्यंत …
Read More »जवाहर साखर कारखान्याचा सदलग्यात ऊस संगोपन परिसंवाद
सदलगा : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी यांच्यावतीने सदलग्यातील जनता बँकेच्या सभागृहात येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्टकेम टेक्नॉलॉजीच्या सहयोगाने ऊस पीक संगोपन या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. प्रमुख वक्ते श्री. बिपिन चोरगे होते. राहूल आवाडे, संचालक सुमेरु पाटील, कुमार बदनीकाई, बाळासाहेब पाटील, बिपीन चोरगे (स्मार्टकेम) …
Read More »हुक्केरी पोलिसांकडून दोघा आंतरराज्य भामट्यांकडून २२ लाख रुपयांचे सोन्याचे अलंकार जप्त
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी पोलिसांनी दोघा आंतरराज्य भामट्यांकडून २२ लाख रुपये किंमतीचे ४२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार जप्त केले आहे. याविषयीची पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, हुक्केरी कोर्ट सर्कल येथे चोर भामट्यांनी एका महिलेला भूलथापा घालून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पोबार केल्याची घटना हुक्केरी पोलिसांत नोंद करण्यात …
Read More »सदलगा नगरपरिषदेकडून ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नियोजन बैठक
सदलगा : येथील नगरपरिषदेच्या मल्लिकार्जुन कल्याण मंटप या सांस्कृतिक भवनात सदलगा नगरपरिषदेकडून ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नियोजन बैठक आयोजित केली होती. या नियोजन बैठकीस नगराध्यक्ष अभिजीत पाटील, मुख्याधिकारी के. के. गावडे, बी. एस. गुरव (समुदाय संघटना अधिकारी), नगरसेवक राजू अमृतसम्माण्णावर, अनिल डेक्कन्नावर, पी. बी. गरदाळे, विजय कोकणे, भरत बोरगांवे, …
Read More »परप्रांतीयांचे लोंढे भूमीपुत्रांच्या मुळावर
खानापूर (विनायक कुंभार) : खानापूरात परप्रांतीयांनी जाळे पसरून इथल्या भूमीपुत्रांच्या व्यवसायांवर अतिक्रमण केले आहे. एवढ्यावरच नथांबत इथल्या गोर गरिबांच्या जमिनी लाटल्या आहेत. निकृष्ट साहित्याची अल्पदरात विक्री करून बाजारातील मान्यताप्राप्त कंपन्यांच्या साहित्य विक्री करणाऱ्याचे नुकसान केले आहे. खानापुरातील भूमीपुत्रांना बेरोजगरिपासून वाचविण्यासाठी परप्रांतीयावर नियंत्रण हवे आशी भावना लोकातून व्यक्त होऊ लागली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta