Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

सोशल मीडियावर तरुणीचा फोटो वापरून तरुणांची फसवणूक करणाऱ्याला अटक

बेळगाव : तरुणीचा फोटो वापरून बनावट फेसबुक अकाउंट उघडून तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला बेळगाव पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले. महांतेश मूडसे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने एम. स्नेहा नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. तो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील नाईहिंग्लज गावचा रहिवासी आहे. त्याने पीएसआयची शारीरिक चाचणी …

Read More »

संकेश्वरात चर्चेतील नामदेव महिला मंडळाचा माऊली नृत्याविष्कार

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात नुकताच श्री नामदेव शिंपी दैवकी समाजातर्फे संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सोहळ्यात सायंकाळी गांधी चौक येथे नामदेव महिला मंडळाने सादर केलेले शानदार नृत्य लोकांच्या पसंतीला उतरलेले दिसत आहे. सोशल मिडियावर नामदेव महिला मंडळाचे नृत्य चांगलेच गाजत …

Read More »

अडकूर शिवशक्ती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी साधला संवाद

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड)च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध सुरक्षिततेसंदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती गडहिंग्लजचे प्रशासक अभय देसाई, डे. सरपंच गणेश दळवी आदि मान्यवर …

Read More »

माझं “उत्तर” हुक्केरीतून लढत : ए. बी. पाटील

  संकेश्वर (महंमद मोमीन) : उत्तर -बित्तर कांहीं नाहीं. मी हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून लढत देणार असल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते राज्यांचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्सव निमित्त आयोजित सभेला उद्देशून बोलत होते. सभेत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळ्याला हुक्केरी आणि संकेश्वर घटक काॅंग्रेसचे हजारो कार्यकर्ते …

Read More »

एकनाथ शिंदेंना विश्वासघातकी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही ; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. शिंदे गटाकडून, तेच बाळासाहेबांची खरे वारसदार असल्याचा दावा केला जातोय, तर ठाकरे गट त्यांना सतत गद्दर म्हणत आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून आता याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘तुम्हाला अधिकार नाही’ शिंदे गटाचे …

Read More »

खा. शेवाळेंच्या लोकसभा गटनेतेपदी नियुक्तीविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात : लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान

  नवी दिल्ली  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार राहुल शेवाळे यांच्‍या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणारी याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत तसेच खासदार राजन विचारे यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी अवैधरित्या तसेच एकतर्फी निर्णय घेत लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद …

Read More »

’सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण सुरू! : डॉ. नील माधव दास

  पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्याला मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झाला. तेव्हापासून शालेय पाठ्यपुस्तकांत अकबर, टीपू सुलतान आदी मुसलमान आक्रमकांचे धडे शिकवले जाऊ लागले. ते आजपर्यंत चालूच आहे. एकूणच ‘सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षण क्षेत्राचे इस्लामीकरण चालू आहे. हा शिक्षण जिहादच आहे. जोपर्यंत भारत संवैधानिक …

Read More »

अखेर पार्थ चॅटर्जींना मंत्रीपदावरून हटवले

  मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची कारवाई कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जी यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून हटवले आहे. ईडीच्या अटकेनंतर पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी होत होती. दरम्यान, आज ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर काही वेळातच त्यांना मंत्रिपदावरून …

Read More »

‘सर्वांना हवेसे असणारे अंबेडकर’ पुस्तकाचे प्रकाशन

  बेळगाव : कर्नाटकातील प्रसिध्द लेखक डॉ. जी. बी. हरिश यांनी ‘यल्लरिगु बेकाद अंबेडकर…गोत्तेइरद अवेष्टो संगतीगळु’ हे कन्नड पुस्तक लिहिले आहे. याचा मराठी अनुवाद बेळगावातील ख्यात साहित्यिक व अनुवादक श्री. अशोक बाबुराव भंडारी यांनी केला आहे. याचे नाव ‘सर्वांना हवेसे असणारे अंबेडकर…माहीतच नसलेल्या अनेक गोष्टी’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम साध्या …

Read More »

आनंदगड हायस्कूलचे शिक्षक तेगुर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेच्या आनंदगड विद्यालयाचे कन्नड शिक्षक आर. बी. तेगुर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे चेअरमन सिध्दोजी पाटील होते. तर अतिथी म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळचे सचिव विक्रम पाटील, भुवराह अ‍ॅग्रीकल्चर कंपनीचे …

Read More »