Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

“चलो मुंबई”च्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री देसाई यांची भेट

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज रविवारी सकाळी पाटण येथे महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारीचा नियोजित ‘चलो मुंबई’ मोर्चा आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील विविध ताज्या घडामोडींबद्दल चर्चा केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर …

Read More »

हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

  बेळगाव : शहापूर येथील रहिवासी गीता भरमा कोळेकर या 37 वर्षीय मध्यमवर्गीय विवाहितेच्या जीविताच्या हितासाठी तिच्यावर रिडो टीव्ही रिप्लेसमेंट (ओपन हार्ट सर्जरी) शस्त्रक्रियेची अत्यंत गरज असून त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. गीता भरमा कोळेकर यांना खुल्या हृदय शस्त्रक्रियेसाठी (ओपन हार्ट सर्जरी) आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांचे पती …

Read More »

गोकाक येथील प्रसिद्ध होलसेल व्यापाऱ्याचे अपहरण व खून

  गोकाक : गोकाकमधील होलसेल किराणा व्यापारी राजेश झंवर (53) यांचे शुक्रवारी अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी गोकाक पोलिसांत केली होती. पण आज त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या करण्यात आल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की, गोकाकमधील होलसेल किराणा व्यापारी राजेश झंवर (53) हे शुक्रवारी सायंकाळी ते सहाच्या सुमारास …

Read More »

गुंजी सरकारी मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे असोगा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

  खानापूर (प्रतिनिधी) : गुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी असोगा (ता. खानापूर) येथील रामलिंग देवस्थानचे दर्शन घेऊन मंदिरच्या परिसराला भेट दिली. मात्र मंदिर परिसर आणि नदीपात्रातील कचरा पाहून परिसर स्वच्छ करण्याचे ठरले लागलीच विद्यार्थी स्वच्छतेच्या कामाला लागले. नुकताच मकरसंक्रांतीच्या सनात भाविकांनी टाकलेल्या नदीपत्रात प्लास्टिक, देवांच्या तस्वीरी, निर्माल्य …

Read More »

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

  मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज …

Read More »

देशात तीन वर्षांत दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था

  अमित शहा; कॅम्पको सुवर्ण महोत्सव, भारत माता मंदिराचे उद्घाटन बंगळूर : देशात येत्या तीन वर्षांत दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली. मंगळूर जिल्ह्यातील पुत्तूर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानावर कॅम्पको सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना …

Read More »

विद्युत झोतातील “अरिहंत चषक” क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन

मान्यवरांची उपस्थिती : चार लाखाची बक्षीसे निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समुहाच्या सहकार्याने निपाणी येथील टॉप स्टार स्पोर्ट्स क्लबतर्फे येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित अरिहंत चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता.११) बोरगाव येथील अरिहंत सौहार्द संस्थेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर माजी आमदार प्रा. …

Read More »

खानापूरच्या विकास कामांकडे दुर्लक्ष केलेल्यांना जनताच धडा शिकवेल; डॉ. सोनाली सरनोबत

  खानापूर : सत्तेत असताना खानापूर तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेल्या काँग्रेस, जेडीएसने निवडणूका डोळ्यासमोर ठेवून यात्रेच्या नावाखाली जनतेशी संपर्क करू पाहत आहेत, असा आरोप खानापूर मतदारसंघातील संभाव्य भाजपा उमेदवार व ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला आहे. काँग्रेस आमदारांनी आपल्या कार्यकाळात खानापूर तालुक्याचा कोणताच विकास केलेला नाही …

Read More »

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीसाठी सर्व प्रकारची मदत देण्यात येणार कोल्हापूर (जिमाका): जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे …

Read More »

कै. जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट यांची २२० वी जयंती साजरी

  बेळगाव (प्रतिनिधी) : दैवज्ञ ब्राम्हण समाज शिक्षण संस्था व श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोासयटी लि., यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटीच्या सभागृहात कै. जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट यांची २२० वी जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर तसेच प्रमुख पाहुणे मंदार मुतकेकर, व्हा. चेअरमन विजय …

Read More »