Sunday , September 20 2026
Breaking News

बुरशीच्या प्रादुर्भावामुळे मिरची पीक धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : उशिरा आलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिपमुळे मिरची पिकावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे हिरवेगार दिसणारे मिरची पीक पिवळे पडत असून हंगाम धोक्यात आला आहे. पिकांवरील हा बुरशीजन्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे.परिणामी या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविली होती. चार-पाच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या रिपरिपमुळे इतर पिकांना दिलासा मिळाला असला, तरी मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र संकट ओढवले आहे. पावसामुळे दमट वातावरण निर्माण झाल्याने मिरचीवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.पावसामुळे शेतातील ओलावा वाढला आहे. त्यामुळे मिरचीच्या रोपांना मुळापासून बुरशी लागण्यास सुरुवात झाल्याने झाडे वाढत आहेत.
——————————————————————–
‘बुरशी आणि मर रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी केंद्राने शिफारस केलेल्या जैविक बुरशीनाशकांची रोपांच्या मुळाशी आळवणी करावी. प्रादुर्भाव रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बुरशीनाशकांची फवारणी करावी. ज्या रोपांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे, ती उपटून नष्ट करावीत. त्यामुळे निरोगी रोपांना संसर्ग होणार नाही.’
-दीपक कौजलगी, कृषी अधिकारी, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *