


खानापूर : जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
आवाहनात म्हटले आहे की, इच्छुक उमेदवारांनी आपल्या-आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराची SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, तसेच त्यांचे नाव मतदार यादीत कायम आहे का, याची तातडीने खात्री करून घ्यावी.
पक्षाच्या मते, एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या मतदाराचे नाव यादीतून वगळल्यास त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकीवर होऊ शकतो.
यामुळे जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या-आपल्या प्रभाग आणि मतदारसंघात जाऊन प्रत्येक मतदाराची SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याची काळजीपूर्वक तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही या आवाहनात नमूद करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta