Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठी भाषिकांना मातृभाषेत कागदपत्रे देण्यासंदर्भात केंद्राची कर्नाटकाला सूचना

  बेळगाव : बेळगाव सीमाभागातील मराठी भाषकांना त्यांच्या मातृभाषेत सरकारी परिपत्रके देण्यात यावीत, सरकारी कार्यालयातून मराठी भाषेत फलक लावण्यात यावेत. यासंदर्भात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या वतीने सातत्याने मागणी केली जात आहे. आपल्या मागणी संदर्भात म. ए. समितीच्या वतीने केंद्र सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. जून महिन्यात महाराष्ट्र एकिरण समितीने गृहमंत्रालयाला …

Read More »

सिंगीनकोपच्या कोसळलेल्या शाळा इमारतीला केंद्रीय पथकाची भेट

  खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्या जमिनदोस्त झाल्या. याची पाहणी केंद्रीय पथकासह जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज केली. यावेळी केंद्रीय जल आयोग, जल उर्जा मंत्रालयाचे संचालक अशोक कुमार व्ही यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि …

Read More »

रऊफसोबत बैठकीचा आरोप, पेडणेकरांनी थेट कोश्यारी-फडणवीस-शेलारांचं ’मेमन’ कनेक्शन दाखवलं!

  मुंबई : किशोरी पेडणेकर यांची याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत बैठक झाली असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. पेडणेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे रऊफ मेमनचे फोटो दाखवून भाजपला रोखठोक प्रत्युत्तर दिलंय. आता फडणवीस …

Read More »

दोन महिन्यात जिल्ह्यात एकूण 355 कोटी रुपयांचे नुकसान

केंद्रीय पथकाला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली माहिती बेळगाव : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय अभ्यास पथकाने आज शनिवारी केली आहे. या दौर्‍यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केंद्रीय पथकाला गेल्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी संदर्भात सविस्तर माहिती दिली. अतिवृष्टीमुळे दोन महिन्यात 355 कोटी रुपयांची …

Read More »

प्रकाश जावडेकर, विनोद तावडे व पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपची नवी जबाबदारी

  नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा कंबर कसत असून आज पक्षाने विविध राज्यांतील ’सेनापतीं’ची नियुक्ती केली आहे. भाजपाने 15 राज्यांमध्ये आपले नवे प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, जेपी नड्डा यांनी नावांच्या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे आणि ही यादी …

Read More »

कोगनोळी परिसरात सोयाबीन कापणी, मळणीच्या कामाला गती

  कोगनोळी : परिसरात सध्या सोयाबीन पिकाच्या कापणी, मळणीच्या कामाला गती आली असून या कामात शेतकरी वर्ग गुंतला असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यामध्ये या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला होता. पावसाचा लाभ घेत अनेक शेतकर्‍यांनी 9305 या जातीच्या सोयाबीन बियांची पेरणी केली होती. सोयाबीन पिकाच्या कापणी व मळणीचे …

Read More »

सुळगांव येथे आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार

  कोगनोळी : सुळगांव तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेतील शिक्षक डी. ए. मूराळी व एल. वाय. जाधव यांना 2019-20 सालातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉक्टर गोरखनाथ चौगुले होते. …

Read More »

पारंपारिक वाद्य, लेसर शो मध्ये निपाणीत बापाला निरोप….

तब्बल आठ तास मिरवणूक : महादेव गल्ली मिरवणूक लक्षवेधी निपाणी (वार्ता): ’गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ’ असा जयघोष, डीजे वरील ताल, अत्याधुनिक प्रकाश यंत्रणा आणि ढोल ताशांच्या तालावर आनंदाने नाचत हजारो निपाणीकरांनी लाडक्या बाप्पाला शुक्रवारी (ता.9) भावपूर्ण निरोप दिला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे विसर्जन झाले. अनुचित …

Read More »

यमकनमर्डी येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक

  बेळगाव : यमकनमर्डी येथील 28 वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणाने खळबळजनक वळण घेतल्याने पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विनायक सोमशेखर होरकेरी (28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. महांतेश इराप्पा करगुप्पी, संतोष गुरव, ईरन्ना हिनक्कन्नावर, आदित्य प्रकाश गणाचारी, शानुरा गजरासाब नदाफ यांना अटक करण्यात आली. पूर्व वैमनस्यातून …

Read More »

राहुल गांधींच्या टी-शर्टवरून वाद, भाजप-काँग्रेसमध्ये खडाजंगी

  नवी दिल्ली : राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. बेरोजगारी, महागाई, गरिबी या मुद्द्यांवरून काँग्रेस सातत्याने भाजपला घेरते आहे, तर या भेटीतून जनतेचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा काँग्रेसचा हेतू आहे. तर भाजपही या यात्रेवर खास लक्ष ठेवून आहे. …

Read More »