नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून यामध्ये संसदेतील 99.18 टक्के खासदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती चिफ रिटर्निंग अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रातील 283 आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे तर 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. …
Read More »खानापूर तालुका समितीतर्फे बेळगाव-पणजी महामार्गावर ठिय्या आंदोलन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव-पणजी महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन करण्यात आले. रामनगर-खानापूर रस्ता हा खड्डेमय झाला आहे. वेळोवेळी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. दि.7 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तहसीलदारांना …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचा अधिकारग्रहण उत्साहात
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या नव्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ बेळगावात उत्साहात पार पडला. बेळगावातील मंडोळी रोडवरील गॅलॅक्सी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या नव्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष रवी हत्तरगी, सचिव अमित पाटील, कोषाध्यक्ष भरतेश पाटील आदी पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला. गणेश स्तवनाने …
Read More »मैत्रेयी कलामंच समुहातर्फे आगळी वेगळी गुरुपोर्णिमा साजरी
बेळगाव : मैत्रेयी कलामंच समूहातर्फे नुकतीच जत्तिमठ येथे गुरुपोर्णिमा साजरी झाली. प्रेमा शिवाजी मनवाडकर, नाझर कॅम्प वडगाव अंगणवाडी शिक्षिका (वडगाव) व जयश्री महादेव बडवण्णाचे, रिसालदार अंगणवाडी शिक्षिका (कंग्राळ गल्ली) या दोन अंगणवाडी शिक्षिकांचा साडीचोळी, श्रीफळ, पुष्प देऊन सन्मान करण्यात येऊन शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणुन …
Read More »केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा
भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी बैठक बेळगाव : आज दिनांक 18-07-2022 रोजी युवा मोर्चा कार्यकारिणी सभा भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालयामध्ये संपन्न झाली. सभेची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. सभेचे प्रास्ताविक जिल्हा युवा मोर्चा प्रधान कार्यदर्शी चेतन पाटील यांनी केले. सभेला जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री. बसवराज नेसर्गी यांनी कार्यकर्त्यांना संबोधन करून …
Read More »इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त
लंडन : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टीम इंडियाविरुद्धची मालिका हरल्यानंतर बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला रामराम घेतला आहे. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असून तो टी-20 आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. बेन स्टोक्स निवृत्तीबाबत म्हणाला की, तीनही क्रिकेट प्रकारात खेळणे माझ्यासाठी …
Read More »शिंदेंकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नव्या कार्यकारिणीमध्ये नव्यानं सर्व पदांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेतील प्रमुखपद जे नेहमीच खास राहिलं आहे. त्या शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेनापक्षप्रमुख या पदाबाबत मात्र कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. एकूणच असं कोणतंही नवं पद या गटानं …
Read More »बेळगावात बुस्टर डोस जिल्हास्तरीय लसीकरणाचा प्रारंभ
बेळगाव : बेळगाव शहरात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत प्रतिबंधात्मक बुस्टर डोस जिल्हास्तरीय लसीकरण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, कोविड लसीकरण अमृत महोत्सवानिमित्त, सर्वांना मोफत बुस्टर डोस देण्याच्या जिल्हास्तरीय मोहिमेचा उद्घाटन समारंभ …
Read More »पीक व घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई देण्यात येणार
पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची सुचना बेळगाव : नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांचे व घरांच्या नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करून तातडीने कार्यवाही करावी, अशा कडक सूचना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत. भरपाई देण्यासाठी घेतले. चिक्कोडी येथे आज सोमवारी अतिवृष्टी आणि पुराच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते. …
Read More »सरकारने सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत
प्रशांत नाईक : राजेश क्षीरसागर यांची भेट निपाणी (वार्ता) : शिवसेनेचे नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि राज्य नियोजन मंडळाचे मंत्री राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय या कोल्हापूरमधील बुधवारपेठेतील कार्यालयातील निपाणी येथील शिष्टमंडळाने भेट देऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी निपाणीतील शिष्टमंडळातील प्रशांत नाईक आणि नवनाथ चव्हाण यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta