बेळगाव : बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून चोरट्यानी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला आहे. पहिला मुख्य दुसरा क्रॉस सदाशिवनगर विजय बेकरीनजिक मंगळवार (ता.१६) सकाळी ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अनुजा बसवराज धबाडी यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीसाठी बैठक
बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. तालुका समिती (एन डी गट) आणि तालुका समिती (बी आय गट) दोन्ही समित्यांच्या बैठक संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या गुरुवार दि. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात …
Read More »एमडी अंमली पदार्थाचे चंदगड तालूक्यात धागेदोरे, एकाला अटक
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सध्या देशभर गाजत असलेले ड्रग्ज प्रकरणातील हाय प्रोफाईल मुंबई कनेक्शन थेट चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीशी आल्याने चंदगड तालूक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका हाय प्रोफाईल वकिलाचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत असून या प्रकरणात ढोलगरवाडीतून एकाला अटक करून पोलिसांची टिम मुंबईला रवाना झाली आहे. …
Read More »ऑलराऊंडर हार्दिक पांड्या कडून,मुंबई विमानतळावर 5 कोटींची घड्याळे जप्त
मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अडचणीत येताना दिसत आहे. खराब फॉर्ममुळे हार्दिक पांड्या याला टीम इंडियातून वगळण्यात आले. त्यानंतर आता मुंबई विमानतळावर त्याच्याकडून 5 कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. कस्टम विभागाने ही जप्तीची कारवाई केली आहे. हार्दीक पांड्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियासोबत यूएईमध्ये होता. …
Read More »शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
पुणे : गेल्या शतकभरात संपूर्ण देशाला छत्रपती शिवरायांचा इतिहास समजून सांगणारे युगपुरुष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय 100) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले रविवारी सायंकाळपासून त्यांच्या मृत्यूची वार्ता विविध माध्यमातून पसरत होती मात्र सोमवारी पहाटे पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, …
Read More »परमज्योति भगवती ऐश्वर्यपादुका दीक्षा समारंभ उद्या
बेळगाव : दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो, या दिवसाचे औचित्य साधून श्री अम्माभगवान भक्तमंडळीसाठी खासबाग येथील जयवंती मंगल कार्यालयात परमज्योति भगवती ऐश्वर्यपादुका दीक्षा समारंभ रविवार दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी होणार असून भक्तांनी ३.३०च्या आत हजर रहावे, बरोबर ३. ४५ वाजता आरती …
Read More »मच्छे भागातील विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
बेळगाव : मच्छे भागात अपुऱ्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांनी आज सकाळी रास्तारोको केला. खानापूरहूनन निघालेल्या बसेस या फुल असल्याने विद्यार्थ्यांना बसमध्ये चढता येत नाही. परिणामी या भागातील विद्यार्थ्यांना तासंतास एकाच ठिकाणी थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. परिस्थितीला कंटाळून विद्यार्थ्यांनी मच्छे नेहरूनगर येथे रास्ता रोको करून बसचा …
Read More »हलशीवाडी येथे 5 डिसेंबरपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्ट्सच्या वतीने 5 डिसेंबरपासून ग्रामीण भाग मर्यादित भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. नरसेवाडी गायरान हलशी येथील मैदानावर स्पर्धा पार पडणार असून स्पर्धेतील विजेत्या संघाला सागर पाटील यांच्या स्मरणार्थ साहेब फौंडेशन बेळगावतर्फे 41 हजार रूपये व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला …
Read More »माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने आर्ष विद्या केंद्रातील विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण
बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने आर्ष विद्या केंद्रातील विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण करण्यात आले. या आश्रमामध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थिनी शिक्षणाकरिता परगावाहून या ठिकाणी शिक्षण घेण्याकरिता आले आहेत. या विद्यार्थिनींचा दिवाळी सण द्विगुणीत करण्याकरिता माधुरी जाधव फाउंडेशन यांच्याकडून नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले. या गणवेश करिता मोलाचे सहकार्य केलेले खडेबाजार बेळगाव येथील …
Read More »कागल-मुरगूड रस्त्यावर चालत्या गाडीचा स्फोट; चालकाचा होरपळून मृत्यू
मुरगुड : कागल मुरगुड रस्त्यावर व्हणाळी (ता कागल जि कोल्हापूर) च्याजवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट झाला. गाडी जळत जळत घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. गाडी चालकाचा होरपळून मृत्यू झाला. पूर्ण जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडला आहे. घटनास्थळी कागल पोलीस दाखल झाले असून घटनास्थळी प्रचंड …
Read More »