Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

दीपावली निमित्त ज्ञानेश्वर माऊली ग्रुपच्या वतीने आदीवासी लोकांना स्वीट, कपड्याचे वितरण

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बाचोळी नजीक असलेल्या जंगलातील आदिवासी लोकाना गेल्या ६० वर्षापासून भारताचे नागरिक म्हणून जीवन जगताना त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, की जीवन उपयुक्त लागणाऱ्या पाणी, उदरनिर्वाहसाठी लागणारी सामग्री, वीजपुरवठा, रस्ता, शिक्षण अशाप्रकारची कोणतीच सोय नाही. अशा नागरिकांना खास दीपावलीच्या सनाचे औचित्य साधुन ज्ञानेश्वर माऊली ग्रुपचे अध्यक्ष दिनेश …

Read More »

राज्य स्पर्धेत यश मिळविलेल्या शिक्षकांचा सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील तालुका नोकर संघटनेच्या वतीने येथील पाटील गार्डन सभागृहातील शिक्षकाच्या गौरव सोहळा सत्कार सोहळ्यात मराठी शाळेचे शिक्षक रमेश कवळेकर यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत, कबनाळी शाळेचे शिक्षक बापू दळवी यांनी वेटलिफ्टिंग स्पर्धेत, तर खानापूर चिरमुरकर गल्लीतील मराठी शाळेचे शिक्षक व तालुका नोकर संघटनेचे खजांची जे. पी. पाटील …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायत आदर्श बनविण्यासाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद

  बेळगाव : मॉडेल ग्रामपंचायती अंतर्गत दूरदृष्टी या योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायत आता सक्रिय झाली आहे. आणि त्यासाठी काल 24-10-2022 रोजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील, उपाध्यक्ष, पीडीओ, अरूण नाईक ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी गावातील प्रत्येक वार्डमध्ये जाऊन वार्ड सभा घेतल्या. गावामध्ये एकूण 13 वार्ड आहेत. या वार्ड सभांना …

Read More »

ऐन दिवाळीत महिला पोलीस उपनिरीक्षकांची ऑन ड्युटी!

  कर्तव्यदक्ष महिला : दिवाळीत कुटुंबापासून अलिप्तच निपाणी (वार्ता) : सण समारंभापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे समजून अनेक जण काम करीत आहेत. निपाणी येथील शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिक कृष्णवेणी गुर्लहोसुर या गेल्या तीन दिवसापासून निपाणी येथील आपले हेड कॉटर्स सोडून कित्तूर येथे कर्तव्य बजावत आहेत. ऐन दिवाळीत कुटुंबाला बाजूला ठेवून त्यांनी केलेले …

Read More »

वड्डेबैल येथे सुतळी बाँबस्फोटात ग्राम पंचायत सदस्य सूर्याजी पाटील जखमी

  खानापूर (प्रतिनिधी) : वड्डेबैल (ता. खानापूर) गावचा सुपूत्र व चापगांव ग्राम पंचायत सदस्य सूर्याजी पाटील हे शेतात गवत कापण्यासाठी गेले होते. शेतात शिकारीसाठी ठेवलेला सुतळीबॉम्ब गवत कापताना विळ्याचा स्पर्श होऊन स्फोट झाला. त्यात त्यांच्या हाताची बोटे फुटून गेली. शिवाय ते गंभीर जखमी झाले. लागलीच त्याना बेळगांव येथील विजय हाॅस्पीटलमध्ये …

Read More »

निपाणीत दिव्यांचा झगमगाट!

घरोघरी लक्ष्मीपूजन : शहरात सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी निपाणी (वार्ता) : गुलाबी थंडीत प्रसन्नतेची अनुभूती देणारे सनईचे मंगलमय सूर, दारासमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, पानाफुलांच्या तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार अन् आकाशकंदील, पणत्या, दीपमाळांचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात सोमवारी (ता. २४) निपाणी शहर आणि परिसरात सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन पार पडले. यानिमित्ताने …

Read More »

सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस!

शुभेच्छापत्रे झाली कालबाह्य : तीन दिवसात मोबाईल फुल्ल निपाणी (वार्ता) : पूर्वी दिवाळी म्हटल्यावर आकर्षक रंगसंगीतातले लहान आकाराचे, आकर्षक मोठ्या मजकूर असणारे, ग्रीटिंग कार्ड डोळ्यांसमोर यायचे. आपल्या जीवलगांना, आप्तस्वकीयांना पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे, स्वतः भेटून दिलेले ग्रीटिंग कार्ड वर्षानुवर्षे सांभाळून ठेवले जात होते. वारंवार ते काढून पाहिले जायचे, आठवणीला उजाळा दिला जायचा. …

Read More »

तांत्रिक बिघाडामुळे व्हाट्सअपची सेवा ठप्प

  बेळगाव : संपूर्ण जगभरात संवादाचे एक महत्त्वाचे साधन मानले गेलेल्या व्हाट्सअपची सेवा 12.30 ते 1.30 दरम्यान तासाभरासाठी बंद झाली होती. तांत्रिक अडचणीमुळे व्हाट्सअपची सेवा बंद झाल्याचे कळते. व्हाट्सअप सेवा बंद झाल्यामुळे कोट्यावधी युजेसना आपले संदेश पाठवण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येऊ लागले. दरम्यान व्हाट्सअपची सेवा कशामुळे खंडित झाली आहे …

Read More »

‘एक नोव्हेंबर काळ्या दिनी’ हजारोंच्या संख्येने सामील होणार; येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा निर्धार!

  बेळगाव : एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना करून केंद्र सरकारने मराठी बहुभाषिक असलेला बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आणि 865 खेडी हा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला. त्याला विरोध करण्यासाठी हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून संपूर्ण सीमा भागात पाळला जातो. येत्या मंगळवार दिनांक एक नोव्हेंबर 2022 रोजी शहर …

Read More »

मारिहाळमध्ये नूतन बसवेश्वर मंदिराचे उद्घाटन

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावात नवनिर्मित श्री बसवेश्वर मंदिर व इतर मंदिरांचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या श्री बसवेश्वर मंदिराच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते कळसारोहण …

Read More »