Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

वॉर्ड क्रमांक 10 मध्ये डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण

  बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण मोहीम वॉर्ड क्रमांक 10 येथे राबविण्यात आली. श्री साई दत्त मंदिर हेमु कलानी चौक येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाळकृष्ण गोपाळ तोपिन कट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 10 च्या नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांच्या नेतृत्वाखाली सदर लसीकरण मोहीम …

Read More »

उडुपी येथील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

  बेंगळुर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उडुपी दौर्‍यादरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि विविध अधिकार्‍यांची बैठक घेतली. उडुपी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात अडकलेल्या उडुपी जिल्ह्यातील अनेक नुकसानग्रस्त भागांना भेट देत …

Read More »

राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी; 26 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

  नवी दिल्ली : राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्याचे संरक्षण करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर लवकर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर 26 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. भाजप नेते खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या कार्यकाळात …

Read More »

पन्हाळा गड संवर्धनासाठी तातडीने कार्यवाही करा, संभाजीराजे छत्रपतींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

कोल्हापूर : महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत असल्याने चांगलीच नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली …

Read More »

साईज्योती सेवा संघाच्यावतीने निबंध स्पर्धा उत्साहात

बेळगाव : गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने साईज्योती सेवा संघाच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना संघातर्फे बहुमान वितरण करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान बोलताना साईज्योती सेवा संघाच्या अध्यक्षा ज्योती निलजकर म्हणाल्या की, गुरूंमुळे आपण घडलो आहे. गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असणे गरजेचे आहे. या बक्षीस वितरण सोहळ्यास ज्योती …

Read More »

मुसळधार पावसाने रामगुरवाडीचा रस्ता झाला निकृष्ट दर्जाचा

  खानापूर (प्रतिनिधी) : रामगुरवाडी (ता. खानापूर) गावापासून ते खानापूर जांबोटी, महामार्गा पर्यंतच्या दोन किलो मिटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण वाहून गेले आणि रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणात चक्क शेडू दिसून येत आहे. …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली येडियुराप्पा यांची भेट

  बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या घरी जाऊन भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल पत्रकारांशी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, येडियुराप्पा हे आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांचे मार्गदर्शन …

Read More »

विराट कोहली दुसर्‍या वनडेला देखील मुकणार?

  लंडन : इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने 10 विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 14 जुलैला मँचेस्टरमध्ये होत आहे. मात्र याही वनडे सामन्याला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मुकण्याची शक्यता आहे. त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे विराट कोहली इंग्लंड विरूद्धची पहली …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार सुरूच; पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर सलग तीन दिवसांपासून वरुणराजाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यात सूर्यदर्शनही झालेले नाही. काहीसी उघडीप त्यानंतर पुन्हा जोरदार सरीवर सरी असा पावसाचा खेळ कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सुरु आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजेपर्यंत राजाराम बंधार्‍यावर पाण्याची पातळी 35 फुट 6 …

Read More »

विजापूर येथे महिलेची दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

  विजापूर : मानसिक तणावातून महिलेने तिच्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील हंदिनागुर गावात घडली. 32 वर्षीय अव्वम्मा श्रीशैल गुब्बेवाड असे आत्महत्या केलेल्या या महिलेचे नाव आहे. तिने आपल्या दोन मुलींना आधी विहिरीत ढकलून देऊन स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अव्वम्मा …

Read More »