Friday , October 18 2024
Breaking News

Belgaum Varta

सीडी वर्कना भगदाड, वाहनधारकांची धडधड

रस्त्यावरील सीडी वर्क धोकादायक : दुरुस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष निपाणी (संजय सूर्यवंशी) : शहर आणि उपनगरात वाहने आणि नागरिकांनी नेहमी गजबजलेल्या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे सीडी वर्क पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यांना लहान मोठे भगदाड पडल्याने दुचाकीस्वारासह नागरिकांना धोका पोहोचू शकतो. पण त्याच्या दुरुस्तीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासीयातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

बैलूर विभागात कायमस्वरूपी लाईनमनची नेमणूक करा, अन्यायकारक वीजदरवाढ मागे घ्या

खानापूर युवा समितीची हेस्कॉमकडे मागणी खानापूर : राज्य सरकारने लागू केलेले अन्यायकारक वीजदरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी. तसेच बैलुर परिसरात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, कायमस्वरूपी लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे केली.गुरुवारी दिलेल्या निवेदनात, बैलूर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित करण्यात …

Read More »

लग्नाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस आणि त्यांनी जपली सामाजिक बांधिलकी……

बेळगाव : चर्मकार समाजाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रीपाद बेटगिरी आणि त्यांच्या पत्नी निलम बेटगिरी यांनी काल गुरुवारी आपल्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस स्तुत्य उपक्रमासह साजरा केला. सामाजिक बांधिलकीचे ध्यान राखून बेटगेरी दाम्पत्याने सिद्धार्थ बोर्डिंग येथील गरीबांसोबत आपल्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. त्याचबरोबर लग्नाच्या रौप्यमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्धार्थ बोर्डिंगला …

Read More »

बापट गल्लीतील नवहिंद युवक मंडळाच्यावतीने गरजूंना रेशन किटचे वाटप

बेळगाव : बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्यावतीने तसेच बेळगांव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शहरातील 60 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरीत करण्यात आले.लॉकडाऊनमुळे अनेकजण आर्थिक अडचणीत आले आहे. अशा कुटूंबाची महिती घेऊन आज मंडळाच्यावतीने किटचे वाटप करण्यात आले. यावेळी खडेबाजार पोलीस ठाण्याचे फौजदार आर. बी. सौदागर व त्यांचे सहकारी …

Read More »

मेरड्याजवळ धोकादायक खड्डा;अपघाताचा संभव

खानापूर (प्रतिनिधी) : मेरड्याजवळील (ता. खानापूर) नागरगाळी महामार्गावरील रस्त्यावर नविन सिडी बांधलेल्या ठिकाणी भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे नागरगाळी महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकाना धोका निर्माण झाला आहे.या मार्गावरून रात्री अपरात्रीच्यावेळी येथून ये-जा करताना वाहन खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. किंवा एखाद्याचा जीव जाण्याचा प्रसंग ओढवतो. …

Read More »

कर्नाटक: कुठल्याही धर्माला दुसऱ्या धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार नाही – उच्च न्यायालय

बेंगळुरू : कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवावा म्हणून इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही, असं मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. कोणत्याही धर्माच्या प्रमुखांनी, धर्माच्या कीर्तनकार किंवा प्रवचनकारांनी दुसऱ्या कोणत्याही धर्मांची अवहेलना करु नये असं न्यायमूर्ती एच. पी. संदेश यांनी सांगितलं. दरम्यान आपल्या धर्माबद्दल सांगत असताना इतर …

Read More »

कर्नाटक: राज्य सरकारने तौक्ते चक्रीवादळाने २०९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा वर्तविला अंदाज

बेंगळुरू : कर्नाटक सरकारने तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वंकष सर्वेक्षण केले असून अंदाजे २०९.३० कोटी इतके नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला आहे. केंद्राला दिलेल्या निवेदनात, राज्य सरकारने चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची यादी दिली असून त्यामध्ये १,०४७ कि.मी. रस्ते, समुद्र-क्षरण संरक्षण भिंती, ४७३ घरे, ७१ शासकीय इमारती, २९ छोटी सिंचन योजना, ७९ …

Read More »

खानापूर पत्रकाराना भाजप युवा मोर्चाच्यावतीने मास्क वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात सर्वातून भितीचे वातवरण पसरले होते. जो तो कोरोनाची भिती बाळगुन जीवन जगत होता. अशा कोरोनाच्या काळात खेडोपाडी कोरोना बाधितांच्या सेवेसाठी पत्रकारानी धीर देऊन कोरोनावर मात करण्यासाठी घरोघरी जाऊन माहिती घेऊन सर्वांपर्यंत पत्रकारितेच्या माध्यमातून कार्य केले. अशा तालुका पत्रकाराना भाजप युवा मोर्चाच्यावतीने किट्सचे वितरण सार्वजनिक बांधकाम …

Read More »

16 जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन; संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : येत्या १६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मोर्चा नाही तर मूक आंदोलन होणार असून मंत्री, खासदार व आमदारांनी मराठा आरक्षणासाठी नक्की काय करणार याची ठोस भूमिका तेथे जाहीर करावी, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. १६ जूनला दहा ते एक या वेळेत …

Read More »

प्रलंबित जिओ टॉवर व नवीन टॉवरकरिता पाठपुरावा करून शासनाकडे अहवाल पाठवा…

तरुणांकडून कोकरे, उमगाव, जांबरे ग्रामपंचायतीला देण्यात आले निवेदन चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यांतील उमगाव येथे जिओ टॉवर अनेक वर्ष उभारूनहीं आजतागायत बंद असल्याने प्रशासन व कंपनीकडून लवकरात लवकर हा टॉवर सुरू करण्यात यावा तसेच या भागात दुसऱ्या अन्य टॉवरसाठी ग्रामपंचायतीकडून शासनदरबारी व कंपनीकडे पाठपुरावा व्हावा या मागणीकरिता येथील उमगाव, …

Read More »