बेळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात हलगा येथील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर घडली आहे. सुदर्शन विजय पाटील (वय 22) रा. महावीरनगर हलगा बेळगाव असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर अपघात मंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान घडला. रहदारी दक्षिण पोलिसांनी दिलेल्या …
Read More »येळ्ळूर येथे डेंग्यू संदर्भातील जनजागृतीची बैठक
बेळगाव : ग्राम पंचायत येळ्ळूर व प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांची आज येळ्ळूर येथे डेंग्यू संदर्भात जनजागृतीची बैठक झाली. येळ्ळूर व आवचारहट्टी गावामध्ये डेंग्यू रोगाचे काही रुग्ण सापडले आहेत. यासाठी खबरदारी म्हणून ग्राम पंचायत येळ्ळूर व प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांची येळ्ळूर ग्राम पंचायत कार्यालयामध्ये बैठक घेऊन या बैठकीमध्ये डॉ. …
Read More »पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज : सुनिल चौगुले
जे. के. फाउंडेशनतर्फे व्याख्यान, वृक्षारोपण आणि वृक्षवाटप बेळगांव : मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धीमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे. हे विसरता कामा नये नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामूळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. हे आपण ओळखले पाहिजे. व …
Read More »इरुमुंगलीच्या बिया खाल्ल्याने चौघांना विषबाधा
मत्तीवडे येथील शाळकरी मुलांचा समावेश कोगनोळी : इरुमुंगलीच्या बिया खाल्याने मत्तीवडे (तालुका निपाणी) येथील चार शाळकरी मुलांना विषबाधा झाली आहे. त्यातील दोन मुले अत्यावस्थ आहेत. तर दोन मुले किरकोळ आहेत. त्यांच्यावर कागल येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : एकनाथ शिंदे भाजप सरकारचा खाते वाटपाचा कोणताही फार्म्युला ठरलेला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर बोलताना दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर फडणवीस आज (दि.५) नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत …
Read More »ग्रामीण भागात जलजीवन मिशन योजनेची सुरूवात
बेळगाव : आज अरळीकट्टी, बसापूर, हुलिकवि, नेगेरहाळ, नंदिहळी, राजहंसगड, सुळगा. आदि गावामध्ये बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला अंगडी यांच्याहस्ते जलजीवन मिशन योजनेची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अरळीकट्टी येथून अरळीकट्टी मठाचे मठाधीश श्री शिवमूर्ती देवरु विरक्त मठ यांच्या अमृतहस्ते करण्यात आली. प्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, …
Read More »संकेश्वरात सरतेशेवटी “आर्द्रा” धो-धो बरसला….
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आर्द्रा नक्षत्र काळात बरसणारा पाऊस सरते शेवटी धोधो बरसत निरोप घेताना दिसला. आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी (बळीराजा) खूष झालेला दिसला. खरीपाला पावसाची आवश्यकता असल्याने शेतकरी गेल्या आठवड्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत होता. आज पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद पहावयास मिळाला. यंदा शेतकऱ्यांना मृगाने दगा …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात पूर व्यवस्थापन आढावा बैठक; पूरस्थिती उद्भवल्यास आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीचा आढावा; सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरध्वनीद्वारे सद्यस्थितीची माहिती घेत असून “पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल”, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच एनडीआरएफच्या 2 तुकड्या आज रात्री जिल्ह्यात दाखल होत आहेत, …
Read More »शैक्षणिक साहित्य वाटपाने भरत फुंडे यांचा वाढदिवस साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत सदस्य भरत फुंडे यांचा वाढदिवस सरकारी कन्नड-मराठी शाळेतील शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन साजरा करण्यात आला. भरत फुंडे यांनी २५० शालेय मुलांना अंकलिपी, कंपास वाटप केले. यावेळी शाळेतर्फे भरत यांचा सन्मान करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी बोलताना भरत फुंडे म्हणाले, मोठ्या …
Read More »चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट
बेळगाव: गुरुजी डॉ.चंद्रशेखर यांच्या हत्येनंतर काही तासात त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे अटक केली असून ते गुरुजींचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या हत्येत वनजाक्षी या महिलेचा सहभाग असल्याचे उघड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta