Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

डॉ. अमित एस. जाडे यांची राष्ट्रीय सेस्टोबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

बेळगाव : सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि आंध्र प्रदेश सेस्टोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त पुढील जुलै महिन्यात अनंतपुरम आंध्र प्रदेश येथे आयोजित केल्या जाणाऱ्या पुरुष आणि महिलांच्या दुसऱ्या दक्षिण विभागीय राष्ट्रीय सेस्टोबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी (टेक्निकल ऑफिसर) म्हणून बेळगावच्या डॉ. अमित एस. जाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेस्टोबॉल फेडरेशन …

Read More »

कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद बेळगाव यांच्यावतीने निदर्शने

बेळगाव : अनुसूचित जातीचा समाजाकरिता देण्यात आलेले अनुदान दुसऱ्या ठिकाणी वापरला जात आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती वर्गावर अन्याय होत असून हा अनुदान दुसऱ्या ठिकाणी जे वापरत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आज कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद बेळगाव यांच्यावतीने निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आपल्या विविध मागण्या पूर्ण …

Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे देण्याची मागणी

बेळगाव : मागील दोन वर्षांपासून वसाहत योजनेच्या लाभार्थ्यांना घरी मिळालेली नाहीत. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजने मधील घरे गोरगरिबांना उपलब्ध करून द्यावीत, अशा मागणीसाठी विविध संघटनांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की अनेक वेळा स्वतःचे घरकुल मिळेल या आशेवर …

Read More »

तब्बल ७ भ्रूणांची हत्या!

मुडलगीत भयानक प्रकार उघडकीस बेळगाव : गर्भधारणा होताच आता कुठे ते अंकुर धरू लागले होते. पण खुलण्याआधीच त्या कळ्या खुडून टाकण्यात आल्या. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ७ भ्रूणांची आईच्या पोटातच असताना निर्घृण हत्या करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगीत भयानक प्रकार उघडकीस आलाय. माणसाच्या क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे या घटनेतून …

Read More »

करणी करणाऱ्यांना बघून घे, भक्तांचे यल्लम्मा देवीला अजब साकडे!

बेळगाव : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यातील लाखो भक्तांची आराध्य देवता सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवीच्या काही अजब भक्तांनी गजब पत्रे लिहून देवीला साकडे घातल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. एका भाविक महिलेने तर मराठी भाषेत चिठ्ठी लिहून मुलीला आणि जावयाला होणार त्रास दूर करण्याचे गाऱ्हाणं घातलं आहे. …

Read More »

कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ काढला मोर्चा

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. राजेश क्षीरसागर हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. क्षीरसागर आणि एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीमधील एकत्र फोटो समोर आला आहे. राजेश क्षीरसागर हे शिंदे गटात सामिल झाल्याने कोल्हापूरमधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

जीएसपीएल कंपनीच्या वतीने वनमहोत्सव साजरा

बेळगाव : वाढत्या उष्णतेमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यायाने निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. निसर्गाचा समतोल अबाधित राखण्यासाठी निसर्गाची हानी न करता आपल्यपरिने प्रत्येकाने अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे विचार जीएसपीएल कंपनीचे संचालक श्री. आर. व्ही. पाठक यांनी मांडले. जीएसपीएल कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या वनमहोत्सव प्रसंगी श्री. डी. ए. …

Read More »

राष्ट्रपती निवडणूक : पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली : सध्या देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला …

Read More »

शिंदे गटाला मोठा धक्का; अजय चौधरी, सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता, कोर्टात धाव घेणार?

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केला आणि शिवसेनेत वादळ आलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. एकीकडे सरकार टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु झाली. अशातच यामागे भाजपचा हात असल्याचे आरोपही सत्ताधाऱ्यांकडून …

Read More »

चन्नेवाडी ता. खानापूर येथे 27 जूनच्या मोर्चाची जनजागृती

खानापूर : 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने चन्नेवाडी याठिकाणी पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली व गावच्या कुलदेव मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्ष निवृत्त शिक्षक प्रकाश पाटील हे होते. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून …

Read More »