संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल ते डॉ. हावळ हाॅस्पिटल दरम्यान जुना पी. बी. रोड चौपदरीकरणाचे काम कसेबसे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होताना दिसत आहे. सदर रस्त्याचे काम व्यवस्थित करावे. अन्यथा संकेश्वर काॅंग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडणार असल्याचे संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी दिलीप …
Read More »आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट टॉप 5 मध्ये पाकिस्तानची एन्ट्री, भारताचं स्थान घसरलं
नवी दिल्ली : पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा सलग 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव केला. ज्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसी विश्वचषक सुपर लीगमध्ये पाकिस्तानने आतापर्यंत 14 सामने खेळून 8 जिंकले आहेत. पाकिस्तानचे 80 गुण आहेत. भारताचं स्थान घसरलं आहे. भारतीय संघाने आतापर्यंत आयसीसी विश्वचषक …
Read More »राज्यसभेचं विजयी सेलिब्रेशन, फडणवीसांची ललकार, आता माघार नाही तर स्वबळावर 2024 जिंकायचं!
मुंबई : आताची छोटी लढाई होती. मोठी लढाई बाकी आहे. पण येणार्या काळातील महानगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समिती सगळीकडे आपण या सरकारला परास्त करणार आहोत. 2024 ची लोकसभा आणि विधान सभा एकहाती भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि राज्यात बहुमताचं सरकार आणेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाविकास …
Read More »विधान परिषदच्या सर्व जागा जिंकू : मंत्री कारजोळ
बेळगाव : भाजपने काल राज्यसभेच्या तीन जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. आता 13 जून रोजी होणार्या विधान परिषद निवडणुकीत भाजप सर्व चार जागा जिंकेल, असा विश्वास मंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केला. बेळगावमध्ये शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, अत्यंत उत्साहाने पदवीधर आणि शिक्षक मतदार भाजपला पाठिंबा …
Read More »विधान परिषद निवडणुकीनिमित्त 13 जून रोजी शाळा -कॉलेजना सुट्टी
बेळगाव : विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त कर्नाटक सरकारने येत्या 13 जून 2022 रोजी विजयापुरा, बागलकोट, म्हैसूर, बेळगाव, चामराजनगर, मंड्या, हासन, धारवाड, हावेरी, गदग आणि कारवार येथील शाळा व कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली आहे. सरकारचा हा निर्णय सर्व सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा -कॉलेजेसना लागू असणार आहे. कर्नाटक वायव्य …
Read More »केंद्रीय कर्मचार्यांना सरकारचा मोठा दिलासा, महागाईत भत्त्यात वाढ
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचार्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. ही वाढ एक जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करणार आहे. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. पाच …
Read More »बेळगावातील सगळ्या सावकारांचे सहकार्य, निरानी, शहापूर विजयी होणार : मुख्यमंत्री बोम्मई
बेळगाव : कालच्या राज्यसभा निवडणुकीत आम्ही तीन जागा जिंकल्या आहेत. आता विधान परिषदेच्या चारही जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावात व्यक्त केला. शनिवारी मुख्यमंत्री बोम्मई यांनी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने प्रथमच तीन जागा जिंकल्या आहेत. आता राज्यसभेत आमचे प्रतिनिधित्व वाढले आहे. त्याचप्रमाणे विधानसभेच्या चार …
Read More »घोडेबाजारात विकले गेलेल्यांची यादी आमच्याकडे, संजय राऊतांचा अपक्षांना इशारा
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदारांची मतं फुटल्यामुळे शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली. या दगाबाजी करणार्या आमदरांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद …
Read More »बेळगाव-गोवा महामार्गावरील माणिकवाडीजवळ कार पलटी
महाराष्ट्रातील चौघे जखमी बेळगाव : बेळगाव-गोवा महामार्गावर माणिकवाडीजवळ कार पलटी झाली. या अपघातात महाराष्ट्रातील चौघे जखमी झाले. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना आज (दि. 11) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला. बेळगाव-गोवा महामार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कार पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांच्या 112 आपत्कालीन …
Read More »भाजपची खेळी यशस्वी; धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार पराभूत
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta