Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगावात एकाच केंद्रामुळे आरटीपीसीआर चाचणीला विलंब

बेळगाव (वार्ता) : विविध कारणांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह सक्तीचा केल्याने बेळगावातील बिम्स इस्पितळ आवारातील कोविड चाचणी केंद्रात नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र एकच केंद्र असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात जाण्यासाठी व तेथून कर्नाटकात येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. त्याशिवाय कोरोनाची सौम्य …

Read More »

17 पासून शाळांचे वर्ग पुनश्च सुरू : जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

बेळगाव (वार्ता) : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन बंद ठेवण्यात आलेले जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे शालेय वर्ग येत्या 17 जानेवारीपासून पुनश्च सुरू केले जावेत, असा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जारी केला आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात …

Read More »

बाधितांच्या डिस्चार्ज धोरणात बदल!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती नवी दिल्ली : देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीनंतर कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांच्या डिस्चार्ज धोरणात बदल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून दिली. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या संसर्गग्रस्तांना …

Read More »

…तर काँग्रेसच्या पदयात्रेवर कारवाई का केली नाही?

उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले बंगळूर (वार्ता) : कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी (ता.12) राज्य सरकारला रॅली, विशेषत: काँग्रेसकडून काढण्यात येणार्‍या रॅलींना परवानगी का दिली आणि दिली नसेल तर योग्य कारवाई का केली गेली नाही, असा जाब विचारून सरकारला चांगलेच फटकारले. या संदर्भात दोन दिवसांत माहिती देण्याचे सरकारला निर्देश दिले. मुख्य न्यायमूर्ती …

Read More »

बेळगांवमध्ये विविध भागांत ड्रेनेज व सिडी निर्माण कामाला आमदार अनिल बेनके यांच्याकडून चालना

बेळगांव (वार्ता) : आज दि. 11 जानेवारी 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी महानगरपालिकेच्या 15 व्या वित्तमधून बेळगांवमधील कामत गल्ली, कोनवाळ गल्ली व साई हॉटेलपासून मराठा मंडळ सर्कलपर्यंत अशा विविध भागात ड्रेनेज, सिडी वर्क व कंपाऊंड वॉल निर्माण कामाचे भुमिपूजन करून चालना दिली. यावेळी बोलताना आमदार अनिल …

Read More »

रामदुर्ग येथील दुकान गाळे धारकांचा लिलावाला विरोध

बेळगाव (वार्ता) : रामदुर्ग नगरपालिकेने पुनर्वसन केलेल्या खोकीधारकांच्या दुकान गाळ्यांचा लिलाव केला जाऊ नये. वाढीव भाडे घ्यावे परंतु त्यांना तेथून हटवू नये, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) रामदुर्ग तालुका समितीने केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) रामदुर्ग तालुका समितीच्या शिष्टमंडळाने आज उपरोक्त मागणीचे निवेदन रामदुर्ग नगरपालिकेच्या मुख्य अधिकार्‍यांसह बेळगाव …

Read More »

उत्तम डॉक्टर व्हा : डॉ. जयप्रकाश करजगी

संकेश्वर (वार्ता) : श्री बिरेश्वर शिक्षण संस्था संचलित कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी उत्तम डॉक्टर व्हावा, असे शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. जयप्रकाश करजगी यांनी सांगितले. ते कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलच्या वार्षिक स्नेहसंमेलन ’तरंग’-2021-22 समारंभात अध्यक्षस्थानी बोलत होते. प्रारंभी विद्यार्थिनींने स्वागतगीत सादर केले. प्रमुख पाहुणे राजीव गांधी विद्यापिठाचे डीन. …

Read More »

झोपडपट्टीवासियांना घोषणा पत्रांचे वाटप

बेळगाव (वार्ता) : कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळ उत्तर मतदारसंघातील घोषित सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झोपडपट्टीवासीयांसाठी घोषणापत्र वितरणाचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला. शहरात आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बेळगाव उत्तरचे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांच्या हस्ते हा घोषणा पत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना …

Read More »

खानापूरात प्राथमिक शाळांच्या आवारात शुकशुकाट

खानापूर (वार्ता) : कर्नाटक राज्यात कोरोना तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून तिसर्‍या लाटेचे संकट निर्माण होत आहे. याची खबरदारी घेऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळा तसेच हायस्कूलमधील इयत्ता नववीच्या वर्गापर्यतच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून देण्यास मंगळवारी दि. 11 ते मंगळवारी दि. 18 पर्यंत निर्बंध घातले आहे. …

Read More »

ग्रामीण भागातील विकासाला प्रथम प्राधान्य : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी

बेळगाव (वार्ता) : बेळगाव ग्रामीण भागातील विकासाला सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल, असे विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. बेळगाव तालुका लवादाच्या मंगळवारी झालेल्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण क्षेत्रात विकास होणे गरजेचे आहे. विकासकामे पूर्ण करण्यासाठी कर्मचार्‍यांनी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे यावेळी उपस्थित …

Read More »