खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीत खानापूर तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णाची गैरसोय होऊ नये. रूग्णाना वेळेत उपचार व्हावेत. यासाठी खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या स्थानिक क्षेत्र विकास अनुदानातुन रुग्णवाहिकांचे लोकार्पण सोहळा शुक्रवारी दि. ११ रोजी पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अंजली निंबाळकर होत्या.यावेळी जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. मुन्याळ, तालुका …
Read More »खानापूरच्या दुर्गम भागात वन टच फौंडेशनतर्फे मदत
खानापूर : गोरगरीब गरजू लोकांना निस्वार्थपणे मदत करण्यात अग्रेसर असलेल्या बेळगावच्या वन टच फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बेटणे, गवळीवाडा, पारवाड, गवळीवाडा या दुर्लक्षित खेडेगावांमध्ये ‘एक हात मदतीचा’ ब्रीदवाक्याला अनुसरून जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. जूना गुडसशेड रोड बेळगाव वन टच फौंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून बेळगाव पासून 55 कि. …
Read More »शनिवार, रविवार कोल्हापुरात कडक लॉकडाऊन; हे राहणार सुरु, हे बंद
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर १७.९६ टक्के आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्हा चौथ्या स्तरामध्ये आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार दरम्यान ठराविक वेळेत सुरू असणारे खेळ, चित्रीकरण, दुकाने, व्यायामशाळा, ब्युटी पार्लरस, स्पा, केशकर्तनालय, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, सायकलिंग शनिवार आणि रविवारी बंद राहतील. यासंदर्भातील आदेश जिल्हा प्रशासनाने …
Read More »बेळगावसह 11 जिल्ह्यात लॉकडाऊन २१ जूनपर्यंत वाढवला
बेंगळुरू : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी राज्यातील बेळगावसह 11 जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पालकमत्र्यांना दिल्या आहेत. कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग अजुनही कमी झाला नसल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना दिल्या मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे चर्चा केली.मागील लॉकडाऊन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध …
Read More »बोरगाव नगरविकास अधिकारी देवमाने यांची बदली
शहरवासीयांकडून संतापाच्या प्रतिक्रिया : कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी निपाणी : बोरगाव नगरपंचायतीचे नगरविकास अधिकारी परशुराम देवमाने यांनी कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यामुळे रुग्ण संख्येला आळा बसला होता. असे असतानाही प्रशासनाने त्यांची तडकाफडकी बदली केल्याने शहरवासियांमधून नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बोरगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून नगरविकास अधिकारी परशुराम देवमाने हे नगर पंचायतीचा …
Read More »श्री महालक्ष्मी कोविड सेंटरमधून रूग्ण सुखरूप
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व लैला शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमधून कोरोनाचे रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परतत आहेत. त्यामुळे नागरिकातून समाधानाचे वातावरण पसरले आहे.तालुक्यातील कोरोना रूग्णाची सेवा व्हावी. त्यांना वेळेत उपचार व्हावेत. या उद्देशाने श्री महालक्ष्मी कोविड केअर …
Read More »महात्मा बसवेश्वरतर्फे लवकरच सिटीस्कॅनची सोय
संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुरबेट्टी : कोरोना योध्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर, नर्स, विविध सामाजिक संघटना रात्रंदिवस अथक परिश्रम घेत आहेत. या कोरोना विरुद्धच्या लढ्यात महात्मा बसवेश्वर क्रेडीट सौहार्द संस्थेचा सहभाग असावा, या उद्देशाने संस्थेतर्फे …
Read More »कोरोनाने गुंडाळला कापड व्यवसाय!
व्यावसायिक बनले कर्जबाजारी : लगीनसराई, उत्सव बंद असल्याचा परिणाम निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने अनेक निर्बंध घालत अत्यावश्यक सेवा विक्री व्यवसाय सुरू आहे. मात्र निपाणी तालुक्यातील कापड दुकानदारांची मागील दोन वर्षांची कोट्यवधीची उलाढाल या परिस्थितीमुळे बुडाली आहे. लग्न समारंभ, यात्रा, उत्सव आणि विविध कार्यक्रमांना बंदी …
Read More »सीडी वर्कना भगदाड, वाहनधारकांची धडधड
रस्त्यावरील सीडी वर्क धोकादायक : दुरुस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष निपाणी (संजय सूर्यवंशी) : शहर आणि उपनगरात वाहने आणि नागरिकांनी नेहमी गजबजलेल्या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे सीडी वर्क पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यांना लहान मोठे भगदाड पडल्याने दुचाकीस्वारासह नागरिकांना धोका पोहोचू शकतो. पण त्याच्या दुरुस्तीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासीयातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त …
Read More »बैलूर विभागात कायमस्वरूपी लाईनमनची नेमणूक करा, अन्यायकारक वीजदरवाढ मागे घ्या
खानापूर युवा समितीची हेस्कॉमकडे मागणी खानापूर : राज्य सरकारने लागू केलेले अन्यायकारक वीजदरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी. तसेच बैलुर परिसरात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, कायमस्वरूपी लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे केली.गुरुवारी दिलेल्या निवेदनात, बैलूर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta