Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

सीमाभागातील पत्रकारांनाही आरोग्य सुविधा द्या : आम. राजेश पाटील

बेळगाव : सीमाभागातील मराठी पत्रकारांना देखील महाराष्ट्र शासनाने आरोग्याच्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी लक्षवेधी सूचना चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात मांडली. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून लाभ दिला जातो. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना 1 ऑगस्ट 2009 रोजी करण्यात …

Read More »

महिला सबलीकरण आज काळाची गरज : शिवाजी कागणीकर

बेळगाव : महिला सबलीकरण आज काळाची गरज आहे, असे राज्योत्सव पुरस्कारप्राप्त पर्यावरणतज्ज्ञ शिवाजी कागणीकर म्हणाले. हुक्केरी तालुक्यातील जारकीहोळी गावातील मजदूर नवनिर्माण संघ यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पाहुण्या म्हणून ‘प्रयत्न’ च्या संस्थापिका सौ. मधू जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी, महिला सक्षमीकरणाची गरज …

Read More »

बेळगाव श्री -2022’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांना निमंत्रण

बेळगाव : बेळगाव शहरातील मराठा युवक संघातर्फे येत्या मंगळवार दि. 29 मार्च रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘बेळगाव श्री -2022’ या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे रीतसर निमंत्रण आज बुधवारी आयोजकांतर्फे पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांना देण्यात आले. बेळगाव श्री -2022 शरीरसौष्ठव स्पर्धेसंदर्भात मराठा युवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी …

Read More »

बेळगावातील शिवसैनिकांकडून संभाजी महाराजांना आदरांजली

बेळगाव : शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग यांच्यातर्फे आज वडे बुद्रुक तुळजापूर (महाराष्ट्र) येथील छत्रपती श्री संभाजी महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहण्यात आली. शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा वैद्य श्रीशके 1610 म्हणजे दि. 11 मार्च रोजी 1689 वा हौतात्म्य दिन आचरणात …

Read More »

खुशखबर! फक्त 2 नियम सोडून 31 मार्चपासून देशातील कोरोनाचे सर्वच निर्बंध हटणार

नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. 31 मार्चपासून कोरोनाचे सर्वच निर्बंध हटवण्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे दोन नियम सोडले की सर्व नियम शिथील करण्याचे केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. 24 मार्च 2020 रोजी …

Read More »

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपद सोडले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी लवकरच नव्या नावाची घोषणा केली आहे. त्यांनी राजीनामा महिला आयोगाचे काम निष्पक्षपणे करायचे असल्याचे सांगितले. एकाचवेळी दोन पदांवर असणे योग्य नसल्याचे …

Read More »

आप्पाचीवाडी ग्राम पंचायत अध्यक्षपदी शालन चव्हाण यांची निवड

उपाध्यक्षपदी आनंदा कुवाळे कोगनोळी : आप्पाचीवाडी येथील ग्राम पंचायत अध्यक्षपदी शालन चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी आनंदा कुवाळे यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून शिशु अभिवृद्धी योजना अधिकारी डी. बी. सुमित्रा यांनी काम पाहिले‌‌. त्यांना सहाय्यक म्हणून पीडीओ लक्ष्मण पारे, सेक्रेटरी संजय खोत, क्लार्क विपीन चव्हाण यांनी सहकार्य केले. यावेळी अध्यक्ष …

Read More »

श्रीक्षेत्र धर्मस्थळ संस्थेच्यावतीने गोरगरीब कुटुंबाना धान्य किटचे वाटप

बेळगाव : श्रीक्षेत्र धर्मस्थळाचे धर्माचार्य श्री. डॉ. वीरेंद्र हेगडे, आई श्री हेमावती व्ही. हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगांव तालुक्यातील सुमारे 85 गरजू आणि गरीब कुटुंबांना जीवनावश्यक गृहोपयोगी साहित्य तसेच अन्न धान्य किटचे वितरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येळ्ळूर येथील काही गरजू आणि गरीब कुटुंबांना जीवनावश्यक गृहोपयोगी साहित्य तसेच …

Read More »

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, सत्यजित कदम यांचा अर्ज दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आज बुधवारी सत्यजित कदम यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना भाजपकडून दसरा चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे आणि अन्य भाजप नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने …

Read More »

’हेल्मेट’ समाजाला प्रेरणा देणारा लघुपट : उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी

निपाणी (वार्ता) : अजित माने दिग्दर्शित हेल्मेट लघु चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच निपाणी येथे पूर्ण झाले. ’हेल्मेट गरज सुरक्षेची एक सामाजिक जाणिव असणारी राष्ट्रीय लघुफिल्म असून यामध्ये आपण निष्काळजी राहिल्याने काय परिणाम भोगावे लागतात, याचे जिवंत उदाहरण हेल्मेट या चित्रपटातून अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडले आहे. हा सस्पेन्स व अंगावर शहारे आणणारा …

Read More »