सांगली : सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून सांगलीमध्ये एका ७ महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पतीसह सासू-सासरे या तिघांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीत कुपवाडा येथील ७ महिन्यांच्या गर्भवती …
Read More »बेळगावच्या चित्रकाराची चित्रे फ्रान्समधील पुस्तकात…
बेळगाव : क्रॉसड ग्लान्सीस हे पुस्तक नुकतेच फ्रान्समध्ये प्रकाशित झाले असून त्यामध्ये जगभरातील निवडक दहा चित्रकारांची माहिती आणि चित्रे असून त्यामध्ये बेळगावचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार विकास पाटणेकर यांचा समावेश आहे. फ्रान्समधील प्रख्यात प्रकाशन संस्था युलेसेसने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. पेट्रा वॉटर्स यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून पुस्तक …
Read More »सेंट अँथनी चर्च येथे 13 रोजी वार्षिक फेस्तचे आयोजन…
बेळगाव : फिश मार्केट, कॅम्प, बेळगाव येथील सेंट अँथनी चर्च येथे शुक्रवार दि. 13 जून 2025 रोजी सेंट अँथनी यांचे वार्षिक फेस्त साजरे होत असून भक्तांनी फेस्तमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सेंट अँथनी वार्षिक फेस्तप्रसंगी बेळगाव शहराच्या विविध भागातून आणि शहराच्या आसपासच्या गावांमधून हजारो यात्रेकरू …
Read More »वटपौर्णिमेच्यानिमित्ताने अन्नपूर्णेश्वर नगर येथील सान्सी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम…
बेळगाव : वटपौर्णिमा अर्थात सुवासिनींनी वडाला पुजण्याचा दिवस. आजच्या दिवशी सावित्रीने स्वतःचा पती सत्यवानाचे प्राण प्रत्यक्ष यमाकडून परत आणले. अशी आख्यायिका आपल्या हिंदू धर्मात सांगितली जाते. तिचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या देशातील लाखो स्त्रिया आजच्या दिवशी वटसावित्रीचा उपवास करतात. वडाला सात प्रदक्षिणा घालतात आणि हाच पती जन्मोजन्मी मिळू दे, …
Read More »बेळगावच्या निर्मात्यांनी साकारलेली मनोरंजनाची अफलातून ट्रीट “ऑल इज वेल” 27 जूनला चित्रपटगृहात
बेळगाव : मैत्री … ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सहकुटुंब अनुभवायला …
Read More »बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी निलंबित पोलिसांच्या निर्णयाविरोधात अभाविपचे आंदोलन
बेळगाव : बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्या निलंबनाच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले. आज बेळगावातील आर.पी.डी. सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थिनी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविपचे राज्य कार्यकारिणी सदस्य मंजुनाथ …
Read More »मुडा प्रकरण : ईडीने १०० कोटीच्या ९२ मालमत्ता केल्या जप्त
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे संशयितांपैकी एक आहेत, अशा म्हैसूर शहर विकास प्राधिकरण ( मुडा ) भूखंडाच्या वाटप प्रकरणाशी संबंधित एका मोठ्या घडामोडीत, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अंदाजे १०० कोटी रुपयांच्या ९२ मालमत्ता जप्त केल्या आहेत. मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात, ईडीने म्हटले आहे की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार …
Read More »राज्यात जातीय जनगणनेचे पुनर्सर्वेक्षण
मुख्यमंत्री सिद्धरामय्या; हायकमांडच्या सूचनेवरून निर्णय बंगळूर, ता. १० : सध्याचा जात जनगणना अहवाल १० वर्षे जुना असल्याने सरकारने एका विशिष्ट वेळेच्या मर्यादेत पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी दिल्लीत घोषणा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “आजच्या बैठकीत आम्ही जातीच्या जनगणनेवर चर्चा केली. बैठकीत …
Read More »शेतातील विहिरीत बुडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू; अथणी येथील घटना
अथणी : बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात ५ वर्षाच्या मुलाचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज गिद्दप्पा वड्डर (वय ५) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, मनोज घराबाहेर खेळत असताना नजीकच असलेल्या विहिरीजवळ गेला अन् पाय घसरल्याने तोल जाऊन …
Read More »जायंट्स आय फौंडेशन आणि जायंट्स मेन यांच्यावतीने नेत्रदान जनजागृती फलक!
बेळगाव : जायंट्स आय फौंडेशन आणि जायंट्स मेन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून सदाशिवनगर स्मशानभूमीत नेत्रदान जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे स्वागत सचिव विजय बनसुर यांनी केले तर प्रास्ताविक माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांनी जायंट्स आय फौंडेशनच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. प्रमुख …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta