Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

पाकिस्तान भारतासोबत नडत राहिला अन् देशाचा एक तृतीयांश भाग गमावला; बलोच आर्मीने झेंडा फडकवला!

  नवी दिल्ली : एकीकडे भारत पाकिस्तानात घुसून कारवाई करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरले आहे. बलोच आर्मीने जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला. केच, मस्टंग आणि कच्छीमधून बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवले. तसेच बहुतांश भागात पाकचे झेंडे काढून बलोच आर्मीने त्यांचे झेंडे फडकावले आहेत. …

Read More »

भारताचा लाहोर, बहावलपूरमध्ये ड्रोन हल्ला

  नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने जम्मूमधील अनेक ड्रोन नष्ट केले आहेत. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील …

Read More »

बेळगावातील मलप्रभा जलाशयाला कडक सुरक्षा व्यवस्था

  बेळगाव : ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशातील आणि राज्यातील सर्व धरणांची आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि बेळगावातील मलप्रभा जलाशयासाठी कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जलाशयांची सुरक्षा आधीच वाढवण्यात आली आहे आणि बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील मलप्रभा धरणासाठी …

Read More »

वंदे भारत एक्सप्रेस लवकरच बेळगावपर्यंत : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव : आता बेळगावकरांसाठी देखील नवीन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे, अशी घोषणा बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली. बंगळूरु-धारवाड दरम्यान सध्या सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस सेवा बेळगाव शहरापर्यंत वाढवण्यासाठी केंद्रीय …

Read More »

ऑपरेशन सिंदुरच्या पार्श्वभूमीवर भाजपचा विजयोत्सव

  बेळगाव : पहेलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदुर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ गुप्त तळांवर अचूक हल्ले करून क्रौर्य गाजवणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्त्युत्तर दिले. याच पार्श्वभूमीवर बेळगाव भाजपच्या वतीने राणी चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिरात विशेष पूजा आयोजित करण्यात आली होती. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. …

Read More »

भरधाव कारची थांबलेल्या ट्रकला धडक; 6 जणांचा जागीच मृत्यू

  हावेरी : थांबलेल्या ट्रकला भरधाव कारने धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोघे जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर ब्याडगी तालुक्यातील मोटेबेन्नूर गावाजवळ आज गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. राणेबेन्नूर येथील सिद्धेश्वर नगर आणि हरिहरसह गोव्यात राहणारे फरान …

Read More »

भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त

  नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतानं सुरू केलेलं ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. त्याच्या काही तासांत संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये भारतीय लष्करानं थेट पाकिस्तानच्या लाहोरजवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे थेट संकेत…

  मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्च करताना राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत सुप्रिया सुळे निर्णय घेतील असे शरद पवारांनी स्पष्ट केले. …

Read More »

उत्तराखंडमध्ये खाजगी हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू

  उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात सकाळी ९ वाजता गंगोत्रीकडे जाणारे एक खाजगी हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक रहिवासी आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. हेलिकॉप्टरमध्ये सुमारे सात प्रवासी होते आणि दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, लष्कराचे जवान, आपत्ती …

Read More »

ऑपरेशन सिंदूरमध्ये बेळगावची सून…

  बेळगाव : बेळगाव ही वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायण्णा, बेळवडी मल्लम्मा यांची क्रांतीची भूमी आहे. जेव्हा देशात क्रांती होते, तेव्हा अर्थातच क्रांतीच्या भूमीची भूमिका देखील असते. ऑपरेशन सिंदूरमध्ये बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील सूनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ही बेळगाव जिल्ह्यातील लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पाकिस्तानी …

Read More »