बेळगाव : बेळगावमध्ये एका वृद्ध उद्योजकाला सायबर फसवणूक करणाऱ्यांनी लक्ष्य केले. त्यांनी त्याला मनी लॉंड्रिंग प्रकरणात अडकण्याची भीती दाखवून तब्बल १५ कोटी ४५ लाख रुपये उकळवले. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून दाखवून व्हिडिओ कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी दिली आणि उद्योजकाकडून रक्कम हप्त्यांमध्ये घेतली. बेळगाव सायबर क्राईम पोलिसांच्या तपासात समोर …
Read More »उद्या कुद्रेमानी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हनुमान जन्मोत्सव सोहळा
कुद्रेमानी (प्रतिनिधी) : कुद्रेमानी येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण व अखंड हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे ४० वे पुष्प भक्तिभावाच्या वातावरणात साजरे होणार आहे. हा पवित्र सोहळा चैत्र शुद्ध द्वादशी ते चैत्र कृष्ण प्रतिपदा या कालावधीत सोमवार दि. ३० मार्च २०२६ ते शुक्रवार दि. ३ एप्रिल २०२६ दरम्यान …
Read More »सायबर स्कॅमर्सपासून सावध राहून आर्थिक नुकसान टाळा; पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन
बेळगाव : “आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहणे हा आपल्या सजगतेचा भाग आहे. कोणत्याही आमिषाला किंवा भीतीला बळी न पडता, ज्येष्ठ नागरिकांनी सावध राहून आपली ऑनलाईन फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळावे,” असे आवाहन बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे (IPS) यांनी केले. शनिवारी, २८ मार्च रोजी टिळकवाडी …
Read More »सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सह्यांची मोहिम; खानापूर तालुका समितीची बैठक मंगळवारी
खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव …
Read More »सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाबाबत उद्या घेणार महाराष्ट्र सरकारची भेट
निपाणी ( वार्ता) : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून आजपर्यंत सीमा भागात कन्नड मराठी भाषिक एकत्रितपणे राहत आहेत. तरीही कर्नाटक सरकार वेगवेगळ्या मार्गाने सीमा भागातील मराठी बांधवावर अन्याय करीत आहे. याशिवाय कन्नड सक्तीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्यस्थी करून सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींची …
Read More »चालकाच्या प्रसंगावधानाने ‘बर्निंग बस’चा थरार वाचला
सौंदलगा बस स्थानकावरील घटना : प्रवाशांनी मारल्या बसमधून उड्या निपाणी (वार्ता) : सध्या उन्हाळा सुरू असून या काळात वाहनांना शॉर्टसर्किट व इतर कारणांनी आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच निपाणी आगाराची निपाणी -कुन्नूर ही बस (क्रमांक के.ए.२३-३११) रविवारी (ता.२९) सायंकाळी पाच वाजता सुमारास सौंदलगा बस स्थानकावर आल्यानंतर इंजिन मधून …
Read More »भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटीने बजावला समन्स
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स बजावला आहे. या प्रकरणी त्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका संस्थान या ट्रस्टच्या विश्वस्त होत्या. त्यामुळे आता …
Read More »मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी या बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.
Read More »निपाणकर सरकार राजवाड्यातील मानाची पालखी, सासनकाठी शिंगणापूरकडे रवाना
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यातील मानाची सासनकाठी व पालखी श्री क्षेत्र त्र शिखर शिंगणापूर महादेव मंदिराकडे निपाणी येथून रवाना झाली. त्यानिमित्त श्रीमंत दादाराजे देसाई सरकार, मानकरी व मान्यवरांच्या हस्ते सासनकाठीची पूजा करण्यात आली. शिखर शिंगणापूर येथे चैत्र महिन्यानिमित्त निपाणका सरकार घराण्यातील मानाची पालखी …
Read More »‘सर्वोत्तम श्राविका’ पुरस्कार मिळाल्याने ‘अरिहंत’तर्फे मीनाक्षी पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील मीनाक्षी रावसाहेब पाटील यांचे धार्मिक कार्य आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत देशपातळीवर त्यांना मिळालेला हा सन्मान बोरगावसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta