Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

रवळनाथ को – ऑप. हौसिंग फायनान्सतर्फे आयएएस किरण कमते यांचा सत्कार

    निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री. रवळनाथ कोऑप हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) संस्थेतर्फे हत्तरवाट (ता. चिक्कोडी) येथील संस्थेचे सदस किरण कमते हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५३ व्या क्रमांकाने उतीर्ण झाले आहेत. त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सत्कार करण्यात आला. …

Read More »

सीमाप्रश्नी सह्यांची मोहीम यशस्वी करू : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्धार

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. बैठकीचे प्रस्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी समितीचे निष्ठावंत प्रकाश मरगाळे यांची अभिनंदनीय निवड सर्वानुमते करण्यात आली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर हे होते. बैठकीच्या सुरुवातीला रणजीत चव्हाण …

Read More »

दोड्डण्णावर हायस्कूलमध्ये ‘गुरुवंदना’ व ‘स्नेहमिलन’ कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : हालगा येथील श्रीमती जे. आर. दोड्डण्णावर हायस्कूलच्या 2006-07 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘गुरुवंदना आणि स्नेह मिलन’ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. सुमारे 19 वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरुजनांचा सन्मान करून शालेय काळातील आठवणींना उजाळा …

Read More »

भानामतीच्या भीतीने मुलीला ठेवले साखळीने बांधून

  कागवाड तालुक्यातील मूळे गावात धक्कादायक घटना कागवाड : कागवाड तालुक्यातील मूळे गावात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्राय नावाच्या व्यक्तीने आपल्या बुद्धिमंद मुलीला अनेक वर्षे घरात साखळीने बांधून ठेवले, असे समजते. माहितीनुसार, ही तरुणी दहा वर्षांपूर्वी नियमित कॉलेजला जात होती, परंतु तिच्या विचित्र वर्तनामुळे कुटुंबीयांना भानामतीची भीती वाटू …

Read More »

बिहारमध्ये देवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी, ८ महिलांचा जागीच मृत्यू

  नालंदा : नालंदामधील शितला देवीच्या मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ महिलांचा मृत्यू झालाय. तर १२ हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती पाहता मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवीच्या दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने ही …

Read More »

निवाऱ्याअभावी प्रवासी ऊन, पावसातच!

  निपाणी मतदार संघातील अनेक गावात गैरसोय : विद्यार्थी, महिला, वृद्धांची अडचण निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील सर्वच ग्रामीण भागात निपाणी आगारातर्फे बस सुविधा सुरू आहे. पण प्रवाशांना थांबण्यासाठी अनेक गावांमध्ये बस थांब्यावर निवारा शेडच नसल्याने ऊन पावसात प्रवासी, विद्यार्थी वृद्ध नागरिकांना बसची वाट बघत ऊन, पावसातच तासनतास थांबावे …

Read More »

आगामी गणेशोत्सवासाठी पंधरा फुटांपर्यंतच्या मूर्तीची मर्यादा; पोलिस प्रशासनाकडून निर्बंध

    बेळगाव : दरवर्षी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशमूर्तींच्या उंचीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. उंच मूर्तींमुळे विसर्जनावेळी अडचणी निर्माण होत असल्याने प्रशासनाने यंदा आगाऊ निर्णय घेत सर्व गणेशमूर्ती १५ फुटांपेक्षा कमी उंचीच्या ठेवाव्यात, अशी सूचना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केली. सामान्यतः मंडळांकडून गणेशमूर्तींची उंची तीन-चार महिने आधीच निश्चित केली …

Read More »

सुखकर्ता महिला मंडळाच्यावतीने महिला दिन साजरा

  बेळगाव : भाग्यनगर येथील सुखकर्ता महिला मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 28-3-2026 रोजी टिळकवाडी येथील अर्श विद्याश्रम व वडगाव येथील अनाथाश्रमाला भेट देऊन महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आश्रमातील मुलींच्या प्रार्थनागीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आश्रमाच्या अध्यक्षा सौ. भारती मॅडम यांनी आश्रमाची व विद्यार्थ्यांची सर्व माहिती सांगितली. मंडळाच्या सर्व …

Read More »

हिडकल जलाशयात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

  हुक्केरी : शाळांच्या उन्हाळी सुट्टीत हिडकल जलाशयाच्या खाडीत पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी दोघांचा सोमवारी दुपारी हुक्केरी तालुक्यातील हाळेगुडनट्टीजवळ बुडून मृत्यू झाला. घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कृष्णा विठ्ठल खानापुरे (वय १४) आणि प्रज्वल गोकरा (वय १४) दोघेही (रा.दादाबनट्टी येथील आरसी सेंटर) अशी मृत मुलांची नावे आहेत. सुट्टीत …

Read More »