श्रीमंत विजयराजे निपाणकर; एच. ए. मोतीवाला यांची ७६ वी जयंती निपाणी (वार्ता) : व्यवसायातून प्रगती साधणारे अनेक असतात. मात्र सेवाव्रत स्वीकारून समाजातील रंजल्या, गांजल्यांना मानसिक आणि आर्थिक स्वरूपात मायेचा आधार देणारे रत्नशास्त्री दिवंगत एच. ए. मोतीवाला होते. त्यांनी सर्वधर्मातील नागरिकांना, संघ, संस्था, संघटनांना सामाजिक उपक्रमांसाठी तसेच वैयक्तिक गरजूंनाही मदतीचा …
Read More »“बुरा ना मानो होली है” – यळेबैल येथे रंगपंचमी उत्साहात
बेळगांव (प्रतिनिधी) : “बुरा ना मानो होली है” असा आनंदी जल्लोष करत यळेबैल गावात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील युवक, लहान मुले तसेच ग्रामस्थांनी एकमेकांना रंग लावून आनंद व्यक्त केला. सकाळपासूनच गावातील मुख्य चौकात, रंगांची उधळण सुरू होती. अबीर-गुलाल उधळत तरुणांनी डॉल्बीच्या तालावर नाचत सणाचा आनंद …
Read More »डॉ. अंजलीताई निंबाळकर या समाजकारण, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या प्रेरणादायी नेत्या
नेत्या डॉ. अंजलीताई यांना खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेसतर्फे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव व प्रख्यात स्रीरोगतज्ञ डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर या समाजकारण, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या प्रेरणादायी नेत्या आहेत. त्यांनी राजकारणाला केवळ सत्तेचे साधन न मानता समाजपरिवर्तनाचे माध्यम बनवले. खानापूर मतदारसंघाचे …
Read More »तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलच्या दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा (निरोप) समारंभ
खानापूर : आज दिनांक 07 मार्च 2026, श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा 2025-2026 बॅच सदिच्छा (निरोप) समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. भैरु य. शहापूरकर हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून मा. वाय. एन. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पि. …
Read More »नंदगड जेसीएस मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
हलशी : नंदगड येथील जेसीएस मराठी मुला-मुलींच्या शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दोन्ही शाळांमधील शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांचा विद्यार्थिनींच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींकडून उपस्थित महिला …
Read More »यळेबैल येथे जकनुबाई मंदिर परिसरात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे धोका; तात्काळ दुरुस्तीची मागणी
बेळगाव (प्रतिनिधी) : यळेबैल गावातील जकनुबाई मंदिर परिसरातील खुल्या पटांगणात विद्युत तारा खाली लोंबकळत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पटांगणात लहान मुले नियमितपणे खेळत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांनी तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. जकनुबाई मंदिराच्या परिसरात असलेले हे पटांगण गावातील मुलांसाठी …
Read More »पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांना राज्यस्तरीय पुरस्कार
सीमाभागात २५ वर्षांपासून वृक्षसंवर्धनासह पर्यावरण; जनजागृतीचे कार्य निपाणी (वार्ता) : निपाणीचे रहिवासी आणि कागल तालुक्यातील चिळली (ता. कागल) येथील कुमार विद्यामंदिरचे विषय शिक्षक व पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते नामदेव विठोबा चौगुले यांच्या सीमाभागात केलेल्या पर्यावरणीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून बेंगलुरू येथील अखिल कर्नाटक सांस्कृतिक परिषद (आर) या संस्थेकडून त्यांची …
Read More »महिला दिन विशेष : “मातृत्वाची दुहेरी किमया : जुळ्या मुलांच्या आईंची संघर्ष आणि आनंदाची कहाणी”
महिला म्हणजे सृजनाची शक्ती. तिच्या उदरातूनच नवीन जीवनाचा जन्म होतो आणि कुटुंबाला नवी दिशा मिळते. जुळ्या मुलांचे मातृत्व हे आनंदासोबतच मोठी जबाबदारी घेऊन येते. मात्र पती आणि कुटुंबाच्या सहकार्याने हा प्रवास अधिक सुंदर आणि सुखकर होतो, असा अनुभव जुळ्या मुलांच्या मातांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “बेळगाव वार्ता”ने अशा …
Read More »टिळकवाडी परिसरातील २ लॉजमध्ये चोरी; महिलेला अटक, एक फरार
बेळगाव : टिळकवाडी येथील दोन लॉजमधील चोरी प्रकरणांचा टिळकवाडी पोलिसांनी छडा लावला आहे. यासंबंधी संकेश्वर येथील एका महिलेला अटक करण्यात आली असून 32 लाख 86 हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आणखी एक आरोपी फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दीपा महालिंग अवटगी (वय 33) मूळची …
Read More »बेनाडीत रेसिंग असोसिएशनतर्फे ११ रोजी १४ लाख बक्षिसांच्या बैलगाडी शर्यतींचा थरार
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील रेसिंग असोसिएशन कमिटीच्या सहकार्याने हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना आणि जोल्ले ग्रुपतर्फे बुधवारी (ता.११) सकाळी येथील शर्यती माळावर विना लाठी-काठी बैलगाडी व विविध शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १४ लाख रुपये बक्षीसाच्या या शर्यतीकडे निपाणी भागाचे लक्ष लागले आहे. एकाच ठिकाणी थांबून संपूर्ण शर्यत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta