Friday , August 28 2026
Breaking News

चोरीच्या ४८ तासांत दोन आरोपींना अटक : २१ लाखांचे दागिने जप्त

Spread the love

 

बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील होसकोटे येथे झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणाचा कटकोळ पोलिसांनी अवघ्या 48 तासात छडा लावत दोन आरोपींना अटक करून सुमारे 21 लाखांचे सोने चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
महिला वसतीगृहाच्या अधीक्षकांच्या घरातून 21 लाख रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने चोरीस गेले होते वसतीगृह अधीक्षक दिलशाद नदाफ यांच्या घरी 5 मे रोजी चोरी झाली होती. याबाबत नदाफ यांनी कटकोळ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. कटकोळ पोलिसांनी तक्रार दाखल होताच विशेष पथक स्थापन करून तपास नियंत्रणा राबवली होती. तपासा दरम्यान मुडलगी तालुक्यातील कमलदिन्नी येथील हनमनाथ यल्लाप्पा मरापूर (२७) आणि हसीना अप्पासाहेब नदाफ (वय २४) यांना अटक केली. आरोपिंकडून सुमारे 154 ग्रॅम सोन्याचे दागिने, 45 ग्रॅम चांदी तसेच अन्य साहित्य असा एकूण 21 लाख 13 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सीपीआय विनायक बडीगेर, पीएसआय बसवराज कोन्नूर आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व शपथविधी सोहळा शनिवारी

Spread the love  बेळगाव : सामाजिक सेवा, मैत्री आणि जागतिक एकात्मतेचा संदेश घेऊन कार्यरत असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *