Friday , August 28 2026
Breaking News

जेड गल्ली, आळवण गल्ली परिसरात कुत्र्यांचा उच्छाद

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्वाप वाढला असून शहापूर परिसरातील जेड गल्ली, आळवण गल्ली या परिसरात कुत्र्यांच्या एका टोळक्याने उच्छाद मांडला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांची दहशत इतकी वाढली आहे की लहान मुले, महिला यांच्यासह नागरिकांना दिवसादेखील घराबाहेर पडणे कठीण होऊन बसले आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यात १२ हून अधिक नागरीक जखमी झाले असून घरासमोर लावलेल्या दुचाकी वाहनांचेही नुकसान झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार असे समजते की, आळवण गल्ली, जेड गल्ली या भागात काही कुत्र्यांचा कळप अचानक आक्रमक बनला असून रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या पादाचाऱ्यांवर हल्ले करत आहेत. अचानकपणे ही कुत्री आक्रमक झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांच्या कळपाकडून रस्त्याकडेला असलेल्या दुचाकी वाहनांच्या कुशन देखील फाढण्यात आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व शपथविधी सोहळा शनिवारी

Spread the love  बेळगाव : सामाजिक सेवा, मैत्री आणि जागतिक एकात्मतेचा संदेश घेऊन कार्यरत असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *