Thursday , June 25 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा ग्रामीण भाजप महिला मोर्चा सचिव सौ. प्रवीणा फटाण यांचा सत्कार

Spread the love

 

खानापूर : बेळगाव जिल्हा ग्रामीण भाजप महिला मोर्चा सचिवपदी सौ. प्रवीणा सुनील फटाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानिमित्त खानापूर भाजप कार्यालयात सौ. प्रवीणा फटाण यांचा सत्कार आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण जिल्हा महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव पदी तुमची नियुक्ती करताना आज मला आनंद होत आहे. मी आशा करतो की तुम्ही पक्षाने दिलेली ही जबाबदारी अत्यंत जबाबदारीने पार पाडाल आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाल आणि पक्षाची प्रतिमा वाढवण्यासाठी सातत्याने काम कराल तसेच भविष्यातील सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पक्षाला समर्थन द्याल अशी अशा व्यक्त करतो असे म्हणत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना सौ. प्रवीणा फटाण म्हणाल्या की, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
सत्कार समारंभ प्रसंगी खानापूर तालुका अध्यक्ष बसवराज सानीकोप्प, माजी आमदार अरविंद पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद कोचेरी, संजय कुबल, बाबुराव देसाई, जोतिबा रेमानी, सदानंद पाटील, मलाप्पा मारिहाळ, गुंडू तोपिनकट्टी, चेतन मनेरीकर, सुनीता पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

स्वत:च्या अपंगत्वालाच बलस्थानी ठेऊन परशराम गुरव बनले बस्तवाडच्या पंचक्रोशीतील पहिला वकील!

Spread the love  खानापूर : बस्तवाड तालुका खानापूर येथील प्रशांत उर्फ परशराम हे क्लास टू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *