Saturday , May 9 2026
Breaking News

अनगोळमध्ये परवानगीशिवाय डॉल्बी लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Spread the love

 

नवरदेव आणि साऊंड सिस्टम मालकाविरोधात पोलिसांची कारवाई
बेळगाव : अनगोळ परिसरात विवाह कार्यक्रमादरम्यान परवानगीशिवाय डॉल्बी साउंड सिस्टम लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी नवरदेव आणि साऊंड सिस्टम मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या आवाजात डॉल्बी साउंड सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर टिळकवाडी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

तपासादरम्यान संबंधितांकडून डॉल्बी वापरण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र परिसरात ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने परवानगी नाकारली होती. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात साउंड सिस्टम सुरू ठेवण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम २९२, १२५ सह कलम ३(५) तसेच कर्नाटक पोलीस कायदा १९६३ अंतर्गत कलम ३७ सह कलम १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रम आयोजित करताना आवश्यक परवानग्या घेणे आणि ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गावठी दारू आणि अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Spread the love  बेळगाव : शहर व जिल्ह्यातून गावठी दारू व अंमली पदार्थांची विक्री काटेकोरपणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *