Sunday , June 14 2026
Breaking News

कर्नाटकची राजधानी बेंगळूरूमध्ये “महाराष्ट्र दिन” उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुरगी यांच्या बेंगळुरू विभागातर्फे आयोजित ‘अभिवाचन उपक्रम २०२६’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी (दि.३ मे) सायंकाळी ५.३० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन ब्रिगेड लेकफ्रंट क्लब हाऊस, व्हाइटफिल्ड येथे करण्यात आले होते.
या उपक्रमात कविता, गझल, गीत, लेख, लघुकथा आणि भाषण अशा विविध साहित्य प्रकारांचे प्रभावी अभिवाचन सादर करण्यात आले. सहभागी साहित्य रसिकांनी आपल्या आवडत्या विषयांवर रंजक, विनोदी तसेच प्रबोधनपर सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. काही सहभागीांनी गीतांना चाल लावून सादरीकरण करत कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाला BLF Cultural Team आणि मराठी समुदायाचे सहकार्य लाभले. सहभागींसह त्यांच्या कुटुंबीयांचीही उपस्थिती लक्षणीय होती. सर्व सहभागींचा कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून सागर जोशी यांची मराठीतून सादर झालेली स्टँडअप कॉमेडी प्रेक्षकांना खळखळून हसवून गेली. त्यांच्या विनोदी शैलीला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूणच, मराठी भाषा आणि साहित्याचा उत्सव साजरा करणारा हा उपक्रम बेंगळुरूमध्ये यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी डॉ. राजेंद्र पडतुरे व लीना पेंढारकर यांनी हास्य कलाकार सागर जोशी यांना मानाची शाल घातली व करामसाप बेंगळूरू विभाग अध्यक्षा दिपाली वझे यांनी त्यांचेच व्यंगचित्र भेट देऊन स्वागत सत्कार केला.
यावेळी डॉ. नम्रता कुलकर्णी, डॉ. व्ही. टी. मास्ते, ऋषिकेश मोघे, डॉ. महेश वझे, सुषमा सहस्रभोजनी, निमिषा जोशी सह अनेक साहित्यिक व साहित्य रसिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीतील शेट्टी सराफ बंधूंनी बनविला बदामी बनशंकरी देवस्थानसाठी १५० किलोचा चांदीचा रथ

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अप्पय्या शिवरुद्रप्पा शेट्टी सराफ दुकानातून बदामी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *