Tuesday , May 12 2026
Breaking News

सह्याद्री नगरमध्ये 110 केव्ही स्टेशन उभारणीसाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन

Spread the love

 

बेळगाव : येथील सह्याद्री नगर भागात 110 केव्ही वीज उपकेंद्र उभारणीच्या कामाचे भूमिपूजन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी करण्यात आले.

यावेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, “आपला मतदारसंघ 90 टक्के ग्रामीण आणि 10 टक्के शहरी भागांनी बनलेला आहे. शहर भाग गावासारखा आणि गाव भाग अतिदुर्गम भागासारखा होता. महापालिकेच्या हद्दीत असूनही या भागाकडे कोणीच लक्ष दिले नाही. मी आमदार झाल्यानंतर जनतेच्या अपेक्षा समजून घेतल्या आणि लोक अपेक्षा करण्यापूर्वीच विकासकामे करण्याचा प्रयत्न केला.”
“सह्याद्री नगरचा विकास हनुमान नगरप्रमाणे व्हावा, हा माझा संकल्प होता. आज हा भाग त्या दिशेने विकसित होत आहे. पुढील 25 वर्षांची गरज लक्षात घेऊन काम करत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, “या भागात आधीपासून 33 केव्ही स्टेशन होते. मात्र भविष्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून, लोकांनी मागणी करण्यापूर्वीच 110 केव्ही वीज उपकेंद्र उभारले जात आहे. यापुढेही जनतेने माझ्या पाठीशी उभे राहावे.”
यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, “मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या या भागाचा सर्वांगीण विकास करत आहेत. केवळ भाषणे नव्हे तर प्रत्यक्ष विकासकामे येथे दिसून येत आहेत. पुढील 25 वर्षांचा विचार करून या परिसराचा विकास केला जात आहे. 33 केव्ही स्टेशनचे 110 केव्ही स्टेशनमध्ये रूपांतर होत असल्याने नागरिकांना भविष्यात वीज समस्येला सामोरे जावे लागणार नाही. लोकांनी मागणी करण्यापूर्वीच जनहितासाठी काम करणाऱ्या नेत्या म्हणजे लक्ष्मी हेब्बाळकर आहेत.”
या कार्यक्रमाला हेस्कॉमचे सुपरिंटेंडंट इंजिनिअर कृष्णप्पा, पालिका सदस्य मुस्ताक मुल्ला, ठेकेदार देसाई, रावसाहेब पाटील, प्रतिभा, होळेप्पा मंडोळी, शिंदे, रोटी, मोहन सुतार, टोपी तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने नुकताच निकाल जाहिर झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *