Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेत ग्रीन बोर्ड आणि तिजोरीचे उद्घाटन

आयडीबीआय बँकेकडून ९० हजारांची देणगी; पालक सभेच्या निमित्ताने कार्यक्रम येळ्ळूर : येथील मराठी मॉडेल शाळेत पालक सभेचे औचित्य साधून ग्रीन बोर्ड आणि तिजोरी कपाटाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. आयडीबीआय बँकेकडून सुमारे ९० हजार रुपयांच्या या साहित्याची देणगी शाळेला देण्यात आली असून या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक सुविधांमध्ये भर पडली आहे. …

Read More »

स्तवनिधीत हेमाडपंथी पाषाण मंदिरामध्ये सहस्त्रफणी पार्श्वनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ व स्थवनिधी येथील ब्रह्मचर्य आश्रम संचलित श्री पार्श्वनाथ ब्रम्हचार्याश्रम गुरुकुलमध्ये चैत्र कृष्ण पंचमीच्या मुहूर्तावर हेमाडपंथी पद्धतीने पाषाण नूतन मंदिर निर्माण होत आहे. दक्षिण भारतामध्ये कर्नाटकाच्या या प्रवेशद्वारावरती, तवंदी डोंगराच्या पायथ्याशी निर्माण होत असलेल्या या मंदिरामध्ये नूतन नयन मनोहर भगवान १००८ सहस्त्रफणी पार्श्वनाथ तीर्थंकरांची मूर्ती …

Read More »

सहकारी संस्थेत राजकारण करू नका : माजी खासदार रमेश कत्ती

  अकोळ विविधोद्देश ग्रामीण कृषी संघाच्या इमारतीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशाला अन्न पुरवणारा शेतकरी आणि रक्षण करणाऱ्या सैनिकांचे प्रत्येकानी आदर केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला पाहिजे. बाहेरचे लोक निपाणीत नको, त्यासाठी स्थानिक उमेदवारांची गरज आहे. शेतकऱ्यांना डिवचणाऱ्याना निवडणुकीत एका मताला एक लाख रुपये दिले तरी …

Read More »

निपाणीतील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले कर्नाटक राज्य पुरस्काराने सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बेंगळुरू येथील अखिल कर्नाटक सांस्कृतिक परिषदतर्फे आयोजित साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे निपाणी येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक‌ नामदेवराव चौगुले यांना कर्नाटक राज्य पुरस्कार पर्यावरणप्रेमी शिक्षक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.ज्ञानयोगी परमपूज्य श्री. सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या ज्ञानदासोहाच्या प्रेरणेने आयोजित करण्यात …

Read More »

विवेकानंद सौहार्द सोसायटीतर्फे महिला दिन साजरा

  भगिनी निवेदिता ठेव योजनेचा प्रारंभ बेळगांव : येथील सहकार क्षेत्रातील ग्राहकांच्या विश्वासास अल्पावधीत पात्र ठरलेल्या विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीतर्फे सोमवारी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सोसायटीतर्फे केवळ महिलांसाठी भगिनी निवेदिता ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालिका नीता कुलकर्णी होत्या. कर्मचारी सौ. अर्चना दरवंदर यांनी …

Read More »

सिमाभागातील गिरणी कामगार मुंबईला रवाना

  बेळगाव : मुंबई गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची घोषणा सरकारने केली पण त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात सरकार दिरंगाई करत असल्याने श्रमिक संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगार वेळोवेळी आंदोलन करत आहे त्याच प्रमाणे यावेळी सुध्दा श्रमिक संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आझाद मैदानावर १० आंदोलन …

Read More »

आप्पाचीवाडी येथील पूल निर्मितीसाठीच ‘रयत’चा तहसील कार्यालयावर चाबूक मोर्चा

  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामासाठी २५ वर्षांपासून लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देत आहेत. पुलाच्या कामाचे अनेकदा उद्घाटन झाले. मात्र प्रत्यक्षात पुलाचे काम रखडल्याचा आरोप कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केला. रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली आप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी निपाणी तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून तहसीलदार मुंजे …

Read More »

‘फ्रिज’च्या जमान्यातही मातीच्या माठांना मागणी कायम

  निपाणी बाजारपेठेत अनेक ठिकाणी विक्री; चाव्यासह नानाविध प्रकारात उपलब्ध निपाणी (वार्ता) : यंदा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बदलत्या हवामानाने निपाणी शहर, उपनगरे आणि ग्रामीण भागांत तापमानवाढीची चाहूल लागली. ऊन, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गर्मी वाढली आहे. आता मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढले आहे. त्यापासून गारवा मिळवण्यासाठी नागरिक थंड …

Read More »

“ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता संसाराचा गाडा हाकणारी “मोहिनी”

  “स्त्री” हो तुम!! “संघर्ष” भी करो, और श्रृंगार भी! तुम दोनो रूप मे निखर के सामने आओगी!! “ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता संसाराचा गाडा हाकताना संघर्ष करत “पार्सल वितरण सेवा” अर्थात “डिलिव्हरी असोसिएट” म्हणून सेवा बजाविणाऱ्या “मोहिनी राजू रावळोजी” यांचे रूप बेळगावात निखरून आले आहे. बेळगाव शहरात …

Read More »

बी. के. हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ

  बेळगाव : येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चित्रकला शिक्षक श्री. प्रमोद चिदंबर जोशी हे तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एन. जोशी होते. पाहुण्यांचा स्वागत व परिचय श्री मोहिते सर यांनी केले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे संयोजक श्री. भास्करी सर …

Read More »