Monday , August 31 2026
Breaking News

निपाणी नगरपालिकेचे लाखो रुपये पाण्यात

Spread the love

 

सिग्नल यंत्रणा पांढरा हत्ती; चार वर्षांपासून वाहतूक कोंडी

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण आहे. शहरात प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. यावर उपाय म्हणून नगरपालिका प्रशासनाने ९ वर्षांपूर्वी शहरातील बस स्थानक परिसरातील धर्मवीर संभाजी राजे चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. तरीही वर्षभरातच ही यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे या चौकात वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सिग्नलसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
मध्यंतरीच्या काळात नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर कंत्राटदाराकडून ही यंत्रणा नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याचा सोपस्कार पार पडला. मात्र ही यंत्रणाच सदोष असल्याने हस्तांतरण करतांना कोणतेही प्रात्यक्षिक केले गेले नाही. खाबुगिरी करून ‌शहर वाहतूक शाखेकडे हस्तांतरीत करून नगरपालिकेने कंत्राटदाराला सेफ झोन निर्माण करून देयक अदा केले गेले. मुळात ही यंत्रणाच सदोष असल्याने शहर वाहतूक शाखेला या यंत्रणेचे सुसूत्रीकरण करणे कठीण झाले. एखाद्या चौकापुरते सिग्नल सूरू करुन कंत्राटदाराचे सिग्नल पुन्हा बंद पडतात. यामधे शहर वाहतूक शाखेची तारांबळ होत आहे.
धर्मवीर संभाजीराजे चौकात खांब उभे असून सगळेच प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याने या शहराचा वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
——————————————————————–
‘नगरपालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे बऱ्याचदा सिग्नल व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. पण टाइमिंग जुळत नसल्याने अडचण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या धर्मवीर संभाजीराजे चौकात दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच बैठक घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.’
-बी. एस. तळवार, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

ऊस पिकावर पांढऱ्या किडींच्या प्रादूर्भावाने निपाणी भागातील शेतकरी हतबल

Spread the love    निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरातील साखर कारखान्यांच्या उच्च क्षमतेमुळे वाढलेल्या ऊसाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *