Monday , August 31 2026
Breaking News

जिल्ह्यातील पोलीस खात्यात फेरबदल; टिळकवाडी, शहापूर निरीक्षकांचीही बदली

Spread the love

 

बेळगाव : राज्य गृह खात्याने शनिवारी राज्यातील 293 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात बेळगाव जिल्हा आणि शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. टिळकवाडी आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या बदल्यात करण्यात आलेल्या आहेत.

शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी यांची गुप्तचर विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कारवार येथील हेस्कॉम जागृत पथकात कार्यरत असलेले निरीक्षक गोपाळ आर. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजारी यांची खानापूर पीटीएस (पोलीस प्रशिक्षण) केंद्रात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कारवार जिल्ह्यातील शिरशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले निरीक्षक शशिकांत वर्मा यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.

शहापूर आणि टिळकवाडी सारख्या संवेदनशील व महत्त्वाच्या पोलीस ठाणे हद्दीत अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने पोलीस प्रशासन अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याशिवाय संकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवशरण अवजी यांची मंगळूर येथे बदली करण्यात आली आहे. खानापूर पीटीएसमधील निरीक्षक राजू रावसाहेब पाटील यांची बनहट्टी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

युवकांना संघटित करून गावाच्या विकासाला दिशा देणारे नेतृत्व म्हणजे कै. अशोकराव मोदगेकर : श्री. वसंत पाटील

Spread the love  निलजी : रणझुंझार परिवार व कै. अशोकराव मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे समाजाच्या प्रगतीसाठी तळमळीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *