Monday , June 29 2026
Breaking News

जयश्री फर्निचरचे मालक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते यल्लाप्पा रेमाणाचे यांचा प्रामाणिकपणा

Spread the love

 

बेळगाव : उद्यमबाग येथील जयश्री फर्निचरचे मालक, महाराष्ट्र एकीकरण समिती धामणे विभागातील ज्येष्ठ नेते यल्लाप्पा रेमाणाचे यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून सापडलेली पैशांची बॅग, महत्वाची कागदपत्रे मूळ मालकाला सुपूर्द केले.
याबाबतची माहिती अशी की, काल सायंकाळी साधारण 5 च्या सुमारास खानापूर तालुक्यातील चिखले येथील एक कुटुंब फर्निचर खरेदीसाठी उद्यमबाग येथील जयश्री फर्निचर येथे आले होते. त्या दरम्यान त्यांच्याकडील पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग अनावधानाने दुकानात पडली. सदर बाब चिखले येथील कुटुंबीयांच्या उशिरा लक्षात येताच त्यांनी शोधाशोध केली असता ती बॅग सापडली नाही. परंतु आज सकाळी यल्लाप्पा रेमाणाचे यांनी दुकान उघडले असता त्यांना ती पैश्यांची बॅग मिळाली. तत्काळ रेमाणाचे यांनी “त्या” कुटुंबातील सदस्याला संपर्क साधला आणि सदर बॅग त्यांची असल्याची शहानिशा केली आणि बॅगेत सुमारे 75,810 रु रोख, आधार कार्ड, बँकेचे पास बुक व इतर महत्त्वाची कागदपत्रे त्यांना सुपूर्द केली. समिती नेते यल्लाप्पा रेमाणाचे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मतदार फेरनिरीक्षण प्रक्रियेसाठी मराठीत अर्ज उपलब्ध करून द्यावेत : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

Spread the love बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री अंकुश केसरकर यांनी, कर्नाटकच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *