Monday , August 31 2026
Breaking News

निपाणीत ‘अरिहंत चषक’ व्हॉलीबॉल स्पर्धेच्या चषकासह संघाच्या गणवेशाचे अनावरण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री बालवीर स्पोर्ट्स क्लबतर्फे सोमवार (ता. १२) ते रविवार अखेर (ता.१७) अशोक नगर येथील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मधील क्लबच्या मैदानावर प्रथमच ‘अरिहंत चषक’ व्हॉलीबॉल लीग स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या चषकासह‌ संघांच्या गणवेशाचे वितरण सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष पुष्कर तारळे होते. पाच दिवस चालणाऱ्या व्हॉलीबॉल लीग या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अरिहंत चषक व रोख रक्कम बक्षीसे म्हणून देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सहा संघ करण्यात आले आहेत.
स्पर्धेत टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांचा शशांक चॅलेंजर्स, प्रतिक शाह यांचा राजमनी ट्रॅव्हल्स, सुरज राठोड यांचा सुरज राठोड वॉरियर्स, पप्पू पावले यांचा नितीन शिंदे फायटर्स, विजय -हाटवळ यांचा किंग, सोंमनाथ शिंदे यांचा नटराज वेरियर्स अशा ६ संघात लढत होणार आहे. क्लबचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजी मोरे यांनी क्लबच्या वाटचालीचा आढावा घेत १९८५ पासून बालवीर स्पोटर्स क्लब व्हॉलीबॉल सामने आयोजीत केले आहेत. क्लबमधून ८० आंतर राज्यीय खेळाडू बनले असल्याचे सांगून महाराष्ट्र संघाचे कॅप्टन म्हणून काम केल्याचे सांगितले.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अरिहंत चषक व रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट स्मेशर, उत्कृष्ट सेंटर, उत्कृष्ट डिफेन्सर आणि मॅन ऑफ द टूर्नामेंट अशी वैयक्तिक बक्षसे देण्यात येणार आहेत.
यावेळी संघ मालक सोमनाथ शिंदे, प्रतिक शाह, कांतीलाल राठोड, विजय -हाटवळ, पप्पू पावले इम्रान मकानदार, ओंकार शिंदे, भालचंद्र आजरेकर, अजय जाधव, दत्ता ढेंगें, अमोल जाधव, दिपक बगाडे, अवधूत शेडगे, अमोल कुंभार, सचिन व्हनशेट्टी यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब सुर्यवंशी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

ऊस पिकावर पांढऱ्या किडींच्या प्रादूर्भावाने निपाणी भागातील शेतकरी हतबल

Spread the love    निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरातील साखर कारखान्यांच्या उच्च क्षमतेमुळे वाढलेल्या ऊसाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *