बेळगाव : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. महिला दिनाच्या दिवशीच दरवाढ जाहीर केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. बेळगाव शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आरटीओ चौकातील काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी डोक्यावर रिकामे …
Read More »शहापूर येथे हिंदू- मुस्लिम बांधवांकडून इफ्तार कुट एकत्रित साजरा
बेळगाव : नवी गल्ली शहापूर येथील हिंदू-मुस्लिम बांधव गेल्या अनेक वर्षापासून सर्व सण गुण्यागोविंदाने एकत्र साजरे करतात. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील इफ्तार कुट हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकत्रित साजरा करून सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. नवी गल्ली येथील जामिया मशीदीत नवी गल्ली यंग कमिटी आणि पंच कमिटी यांच्या …
Read More »नारीशक्तीत देश चालवण्याची ताकद; महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणासाठी महिला दिन साजरा
खानापूर : नारीशक्ती ही फार मोठी शक्ती असून महिला तालुका, जिल्हा तसेच देशही सक्षमपणे चालवू शकते, हे आपण अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणासाठी महिला दिन साजरा केला जातो, असे मत पंचहमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. खानापूर तालुका पंचहमी योजना समितीच्या वतीने मंगळवारी …
Read More »कांद्याला सोसवेना गोणी दराचा ‘भार’
शेतकऱ्यांच्या घामाला कवडीमोल भावः प्रतिशेकडा १ हजाराचा दर निपाणी (वार्ता) : बंगळूर येथील कांदा बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये रिकाम्या गोणीचा दर जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. १८ ते २० प्रतिकिलो रुपयांच्या दराने कांदा विका लागत असताना, तीच कांदा बारदाण्याच्या गोणीमध्ये भरला जातो. …
Read More »महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्दमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित संस्थेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकारत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी होते. संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर, श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या …
Read More »सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथे जागतिक महिला दिन साजरा
बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत पी. के. घोलपे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थिनींच्या महिला स्फूर्ती गीताने झाली. इतिहास घडविणाऱ्या व समाजाला दिशा दाखविणाऱ्या थोर महिलांच्या वेशभूषा विद्यार्थिनींनी साकारल्या होत्या. यामध्ये …
Read More »युद्धाचा भडका अन् गॅस टंचाईसह दरवाढीचा फटका
हॉटेल व्यावसायिकांची धावाधाव; चढ्या दराने सिलिंडर घेण्याची वेळ निपाणी (वार्ता) : जागतिक स्तरावर युद्धाचा भडका उडाला, तसा गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे घरगुती गॅस २१ दिवसांनी मिळणार आहे, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणे दुरापास्त झाले आहे. हॉटेल व्यावसायिक सिलिंडरसाठी दुप्पट रक्कम मोजत आहेत. तरीही त्यांना सिलिंडर …
Read More »अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने बोरगाव सर्कल रुंदीकरणाचे काम ठप्प
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सर्कल परिसरात अतिक्रमण वाढल्याने वारंवार वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सर्कलचा रुंदीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामाचा प्रारंभ ही मान्यवरांच्या हस्ते झाला. पण परिसरातील अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने सुरू झालेले रुंदीकरणाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह …
Read More »बोरगाव औद्योगिक पार्कबाबत आरोप सिद्ध करूनच बोलावेत विनाकारण अफवा पसरवू नयेत; नगरसेवक शरदराव जंगटे यांचा इशारा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथीलटेक्सटाईल पार्क औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेले सर्व उद्योगधंदे हे कर्नाटक राज्यातील व्यावसायिकांनाच मालकी तत्वावर दिले आहेत. ३९ पैकी २० उद्योजकांना शासकीय सवलतीचा लाभही मिळाला आहे. हेउद्योजक कर्नाटक राज्यातीलच आहेत. पण काही नागरिकांनी हा प्रकल्प, इतर राज्यातील उद्योजकांना दिल्याचे अफवा पसरण्याचा प्रयत्न करत आहेत. शक्य असेल …
Read More »पिण्याच्या पाण्यासाठी रयत गल्लीतील नागरिक आक्रमक; महापालिकेवर धडक मोर्चा
बेळगाव : वडगावमधील रयत गल्ली भागात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी मिसळत असल्याच्या निषेधार्थ रयत गल्लीतील रहिवाशांनी महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वडगावमधील रयत गल्लीतील रहिवासी गेल्या २० दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येचा सामना करत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी मिसळत असल्याबाबत महापालिकेला वारंवार निवेदने देण्यात आली होती, मात्र प्रशासनाने याची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta