Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची ‘लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम’ आता संपूर्ण राज्यात

Spread the love

 

बेळगाव : चोऱ्या, घरफोड्या थोपविण्यासाठी बेळगाव पोलिसांनी सुरू केलेले लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम आता संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे अनेक चोऱ्या, घरफोड्या थोपवता आल्या. त्यामुळे हा उपक्रम आता संपूर्ण राज्यात अस्तित्वात येत आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांना हा उपक्रम चोऱ्या थोपविण्यासाठी प्रभावी वाटल्याने सर्वत्र तो राबविण्याची सूचना देण्यात आली आहे. सर्व जिल्हे व पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम सुरू करण्याची सूचना राज्य पोलीस महासंचालकांनी केली आहे. फळे, भाजीविक्री, कपडे विक्री करण्याच्या निमित्ताने शहर व उपनगरात फिरणाऱ्या काही गुन्हेगारांनी बंद घरांची टेहळणी करून चोऱ्या, घरफोड्या करताना आढळून आले आहेत. नवी दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, तामिळनाडूसह आंतरराज्य गुन्हेगारही शहर व उपनगरात सक्रिय आहेत.

या उपक्रमामुळे तब्बल 286 हून अधिक घरफोड्या टळल्या आहेत. 26 जानेवारी रोजी बेळगाव शहरात लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम सुरू करण्यात आली होती. घरगुती कार्यक्रम, प्रवास आदी निमित्ताने परगावी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराला कुलूप लावून बाहेर पडताना जवळच्या पोलीस स्थानकाला यासंबंधी माहिती द्यायची आहे. यासाठी 8277951146 हा मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात आला होता. व्हॉटसअपवर आपल्या बंद घराचा फोटो व लोकेशन परगावी कधी जाणार, परत कधी येणार? याचा तपशील व घरासोबतची सेल्फी शेअर करायची असते. 112 वर संपर्क साधूनही माहिती देता येते. त्यानंतर संबंधित पोलीस त्या घराबाहेर फेरफटका मारतात. त्याची नोंदही पोलीस स्थानकात असते. पोलिसांचे अशा घरावर लक्ष असते. बेळगावात सुरू केलेल्या या उपक्रमाविषयी गृहमंत्री व राज्य पोलीस महासंचालकांना माहिती देण्यात आली होती. हा उपक्रम चोऱ्या, घरफोड्या रोखण्यासाठी प्रभावी ठरल्यामुळे आता संपूर्ण राज्यात हा उपक्रम सुरू करण्याची सूचना राज्य पोलीस महासंचालकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *