जांबोटी : जिंकण्यासाठीचा प्रचंड आत्मविश्वास त्यातून चाकाने घेतलेला भरधाव वेग, प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून पुढे जाण्याची धडपड, अन प्रेक्षकात होणारा जल्लोष असा सायकलिंग स्पर्धेचा थरार जांबोटी येथे अविस्मरणीय ठरला. गिअरहेड स्टुडिओज बेळगाव व विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय जांबोटी यांच्या संयुक्त विद्यमाने सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण …
Read More »अंगणवाडीतील रिक्त पदे ९० दिवसांत भरण्याचे निर्देश : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
बंगळूर : राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये कोणतेही पद रिक्त झाल्यास ते ९० दिवसांच्या आत भरले जावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायतांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तर तासात गुर्मे सुरेश शेट्टी (कापू मतदारसंघ) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना …
Read More »मत्तीवडे येथे घराला आग लागून; रोख रक्कमेसह प्रापंचिक साहित्य जळून खाक
निपाणी (वार्ता) : शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून रोख रक्कमेसह प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. ही घटना मत्तीवडे (ता. निपाणी) येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जागृततेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रामचंद्र कांबळे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे घरातील …
Read More »“जय, जय महाराष्ट्र” गीत म्हणणाऱ्या तिघांवर खडेबाजार पोलिस स्थानकात गुन्हा
बेळगाव : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड अंतिम सामन्यात भारतीय संघाने विश्वविजेतेपद मिळवताच राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे आनंदोत्सव साजरा करताना “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत म्हणून आनंद साजरा करण्यात आला, याचे पोटशूळ उठलेल्या काही कन्नडधार्जिण्यानी खडेबाजार पोलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. विनायक उर्फ गणपत …
Read More »“परीक्षा म्हणजे क्षमतांची कसोटी; आत्मविश्वासाने सामोरे जा!” : सीमाकवी रवींद्र पाटील
गोजगे हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात बेळगाव (प्रतिनिधी) : “परीक्षा ही केवळ गुणांची स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. तसेच विद्यार्थ्यांनी गुणांसोबत गुणवान, संस्कारवान आणि जबाबदार नागरिक बनणेही तितकेच आवश्यक आहे. मोठी स्वप्ने …
Read More »सीमाभागात कन्नड सक्तीसाठी कन्नड संघटनांकडून प्रादेशिक आयुक्तांवर दबाव
बेळगाव : सीमाभागातील कानडी संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन सीमाभागात भाषिक सक्ती करण्यासाठी आणि स्थानिकांच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी दबाव टाकला. मंगळवारी सकाळी काही कार्यकर्त्यांनी प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांच्या दालनात धाव घेतली. केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या तथाकथित कार्यकर्त्यांनी प्रशासनावर ‘कन्नड सक्ती’साठी दबाव …
Read More »कणकुंबी हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि बक्षिस वितरण संपन्न
कणकुंबी : विश्व भारत सेवा समितीच्या कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयातील दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि शिष्यवृत्ती वितरण असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीत आणि ईशस्तवनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फोटो पूजन करण्यात आले. यावेळी …
Read More »वस्त्रोद्योग खात्यातील कोट्यावधी रुपयाचा निधी लाटला
बोरगाव येथे बैठक ; कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी बोगस दाखले व कागदपत्रे देऊन कर्नाटक राज्याचा वस्त्रोद्योग खात्यातील कोट्यावधी रुपयाचा निधी लाटला आहे. काहींचे व्यवसाय बंद तर काहींनी भाडेतत्त्वावर इतरांना दिले आहे. या वस्त्रोद्योग पार्कात कोटधावधी …
Read More »बेळगावमधील सुरण्णवर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉइंट सर्जरी यशस्वी
बेळगाव : बेळगावमधील सुरण्णवर हॉस्पिटलने अस्थिरोग उपचार क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या राबवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत डॉ. जगदीश सुरण्णवर यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बेळगावच्या वैद्यकीय क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त झाली असल्याची माहिती डॉ. जगदीश सुरण्णवर यांनी पत्रकार …
Read More »अल्पवयीन मुलींच्या अत्याचार प्रकरणी पोक्सोअंतर्गत दोन नराधमांना कारावासाची शिक्षा
बेळगाव : अल्पवयीन मुलींची छेडछाड करून अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात बेळगाव जिल्हा विशेष पॉक्सो न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. या दोन्ही खटल्यांमध्ये आरोपींवरील गुन्हे सिद्ध झाले असून त्यांना कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहिल्या प्रकरणात सचिन अप्पय्या नाईक याला अल्पवयीन मुलीची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta